साहित्यः
५-६ भावनगरी मिरच्या (तुम्ही कुठल्याही कमी तिखट असलेल्या मोठ्या मिरच्या घेऊ शकता,)
२-३ बटाटे उकडून, किसून घेणे
दीड-दोन वाट्या बेसन
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१/४ टीस्पून हिंग
१ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून बडीशेप पावडर
१ टेस्पून जीरेपूड
१ टेस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता)
बारीक चिरलेली कोथींबीर
मीठ चवीनुसार
पाकृ:
किसलेल्या बटाट्याच्या मिश्रणात लाल तिखट, हिरव्या मिरच्या, जीरेपूड, बडीशेप पावडर, चिरलेली कोथींबीर, अनारदाना पावडर व चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे.
मिरच्यांना मध्यभागी चिर द्या. वरील बटाट्याचे सारण मिरच्यांमध्ये नीट भरुन घ्या.
बेसनमध्ये लाल तिखट, हिंग व मीठ घालून एकत्र करा.
त्यात थोडे पाणी घालून मिश्रण भज्यांच्या पीठासारखे तयार करुन घ्या.
कढईत तेल मध्यम आचेवर तापत ठेवा.
तयार केलेल्या मिरच्या बेसनात घोळवून गरम तेलात अलगद सोडा व सोनेरी रंगावर तळून घ्या.

गरमा - गरम राजस्थानी मिरची वडा चिंच-खजुरेच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.