जानदार जुलै!!!

मंडळी या महिन्यात घरच कार्य आहे. तेंव्हा जरा कंबर कसून कामाला लागा. काय?

गेल्या महिन्यात एकूण मिपा उन पावसाच्या खेळातुन चक्री वादळात सापडल्याचा भास देउन गेलं.
मालक अन प्रशांत यांचे त्यावेळी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबदल मानावे तेव्हढे आभार कमीच!
तरीही भविष्याची स्वप्न रंगवणार्‍या या जुलैचे आपण स्वागत करु अन ज्या काही समस्या येतील त्यांना एकदिलाने सामोरे जाउ अशी आशा व्यक्त करत मी माझे चार शब्द संपवते.