लाल मास (चिकन) आणि बाजरीची भाकरी

साहित्यः

चिकन - १.२ किलो
कांद्याची पेस्ट - १ वाटी
सुकी लाल मिरची - १०-१२
धणे - १ चमचा
लसुण - ७-८ पाकळ्या
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
दही - २ चमचे
लिंबु - १/२
लाल तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
धणे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
लवंगा - ३-४
काळि मिरी - ३-४
दालचिनी - १ इंचाचा तुकडा
तेजपत्ता - २-३
हिरवी विलायची - २-३
मोठी विलायची - १
तुप - ४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी

भाकरीसाठी साहित्यः

बाजरीचे पीठ - १ वाटी
गरम पाणी लागेल तसे
तीळ - १ चमचा
मिठ चवीनुसार

कृती:

१. ७-८ सुक्या लाल मिरच्या १ तास पाण्यात भिजवुन ठेवाव्यात. ह्या भिजवलेल्या मिरच्या, धणे व ४ लसुण पाकळ्या ह्याची smooth पेस्ट करुन घ्यावी. तसेच उरलेल्या लसणाच्या ४ पाकळ्यांची पेस्ट करुन घ्यावी.

p1

२. चिकनला १/२ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट, लिंबु, २ चमचे दही, २ चमचे कांद्याची पेस्ट, २ चमचे भिजवलेल्या मिरचीची पेस्ट व थोडेसे मिठ लावुन १-२ तास marinate करावे.
३. कढईत तुप गरम करावे. त्यात आख्खा गरम मसाला टाकुन परतावे. १ मिनिटाने त्यात उरलेली कांद्याची पेस्ट टाकुन निट परतुन घ्यावे.
४.कांदा चांगला परतल्यावर त्यात आख्ख्या ३-४ लाल सुक्या मिरच्या, आले-लसुण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे पावडर व उरलेली लाल मिरचीची पेस्ट टाकुन तेल सुटे पर्यंत परतावे.
५. मसाल्याचे चांगले तेल सुटु लागल्यावर, त्यात marinate केलेले चिकन्चे तुकडे टाकावेत. हे सर्व तुकडे वेगवेगळे ठेवावेत, जेणेकरुन प्रत्येक चिकनचा तुकडा हा खालुन परतला जाईल.
६. अशा प्रकारे चिकन सर्व बाजुन परतल्यावर, त्यात उरलेले marination व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे.
६. मिठ टाकताना हे लक्षात ठेवावे कि marination च्या वेळी सुद्धा थोडे मिठ टाकले होते.
७. चिकन चांगले परतल्यावर त्यावर झाकण ठेवुन मध्यम आचेवर चिकन १०-१५ मिनिटे शिजु द्यावे.
८. १०-१५ मिनिटात चिकन शिजलेले असेल. त्यात १/२ किंवा १ वाटी पाणी टाकुन परत ५ मिनिटे उकळी द्यावी.
९. सर्वात शेवटी त्यात १ चमचा गरम मसाला व १ चमचा लसुण पेस्ट टाकावी.
१०. गरमा-गरम लाल मास (चिकन)तयार आहे.

टिपः

१. इथे मला मटण मिळाले नाही त्यामुळे मी चिकन वापरुन केले आहे. मटण वापरताना सुद्धा सेमच पाकृ असणार, फक्त मटण शिजायला थोडे जास्त पाणी व वेळ लागेल.

p3

भाकरीची पाकृ:

१. बाजरीचे पीठ चाळुन घ्यावे. त्यात चवीनिसार मिठ टाकुन मिक्स करावे.
२. ह्यात पीठ भिजेल इतके गरम पाणी टाकुन, पीठ चांगले मळुन घ्यावे.
३. पीठातील छोटा गोळा घेउन, त्याची भाकरी थापुन घ्यावी.
४. भाकरी थापल्यावर त्यावर थोडे तिळ टाकुन, हलक्या हाताने किंवा एकदा लाटणे फिरवुन त्यावर बसवुन घ्यावे.

p2

५. गरम तव्यावर नेहमी प्रमाणे भाकरी भाजुन घ्यावी.
६. तयार झालेल्या भाकरीवर तुप लावुन, गरमा गरम लाल मास सोबत serve करावे.

टिपः

१. बाजरीचे पीठ हे फ्रेश दळुन आणलेलेच असावे.
२. पीठ जर जुने असेल तर, भाकरी निट थापता येत नाहीत व तसेच त्यांची चव सुद्धा कडु लागते.
३. पीठ भिजवताना चांगले गरम केलेले पाणी वापरावे, म्हणजे भाकरी निट थापली जाते.

p4