मे महिन्यात अक्षरशः दमछाक झाली. गविंना चौथा भाग काढायचासुद्धा कंटाळा आला बहुतेक. त्यामुळे सगळेच नवीन धागा काढायला विसरलेले दिसत आहेत. असो. मे महिना एकूणच वादळी आणि दु:खाचा गेला. जे झालं ते सगळं मागे ठेवून जूनचं स्वागत करूया. पावसाबरोबर नव्या आशा, नवी पालवी सगळ्यांच्या आयुष्यात येवो याच शुभेच्छा!