प्रस्ताव

नमस्कार,

गेले काही दिवस स्वाक्षरी संदर्भात चावडीत चर्चा झाली आहे. त्या संदर्भात परीस्थितीनुरूप (अ‍ॅडहॉक) निर्णय करण्याऐवजी मिपा धोरणात स्पष्ट करून जाहीर केले तर संपादकांना निर्णय घेण्यास सोपे जाईल आणि सर्व सभासदांना समान संदेश मिळेल, असे वाटते. म्हणून हा प्रस्ताव करत आहे. कृपया सर्व संपादक-सल्लागार आणि नीलकांतने आपली मते नोंदवावीत ही विनंती. हे बंदीस्त दालन आहे, त्यामुळे यातील चर्चा येथेच रहाणे अपेक्षित आहे.तसेच यात मतभेद दिसले तरी चालतील, किंबहूना ते जिवंतपणाचे लक्षणच असेल, पण मनभेद होता कामा नयेत ही विनंती.

"मिसळपाव संकेतस्थळावर इतर कुठल्याही संकेतस्थळाचा लेख-चर्चा-प्रतिसादा दरम्यान दुवा देणे अथवा कायम स्वरूपी स्वाक्षरीसारखा वापर करणे हे संपादकमंडळ त्या संस्थळाची जाहीरात समजून अप्रकाशीत करू शकतील आणि तसे परत करण्यापासून प्रतिबंधीत करू शकतील. असा निर्णय घेण्याचे संपूर्ण हक्क हे संपादक मंडळास असतील आणि त्याची कारणमिमांसा देण्यास बांधील नसतील."

आपल्याला वरील ठळक अक्षरात सुचवलेले धोरण मान्य आहे का?

  1. जसेच्या तसे मान्य
  2. काही बदल सुचवून
  3. मान्य नाही कारण...___________
  4. अशा धोरणाची गरज नाही. इतर संस्थळाची जाहीरात केली तरी चालेल.