
चिकन रोगनजोश
सामग्री:
१/२ किलो चिकन
१ छोटा चमचा लसूण पेस्ट
३ मोठे चमचे दही
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
२ मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पूड
मीठ चवीनुसार
मसाला:
१ कांदा
८ लसूण पाकळ्या
१ सुकी लाल मिरची
(कांदा, लसुन आणि मिरची ची पेस्ट करून घ्यावी)
१ मोठा चमचा तेल
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
१ छोटा चमचा बडीशेप पूड
१ छोटा चमचा गरम मसाला पावडर
१ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पूड
अख्खा मसाला -
१ छोटा चमचा जिरे
१ छोटा चमचा काळी मिरी
१ छोटा चमचा लवंग
१ इंच दालचिनी चा तुकडा
३ हिरवी वेलची
१ तेज पत्ता
कृती:
- चिकन ला दही, लसुन पेस्ट, धने जिरे पूड, मिरची पावडर आणि मीठ चांगले चोळून, अर्धा तास फ्रीज मध्ये मुरत थेववे.
- एका भांड्यात तेल गरम करून त्यात चिकन लालसर होई पर्यंत परतून घ्यावे. चिकन दुसऱ्या भांड्यात काढून ठेवून, उरलेल्या तेलात अक्खा (खडा ) मसाला थोडा परतून घ्यावा. मग त्यात कांदा लसुन पेस्ट परतावी आणि त्यावर बाकी मसाले पूड घालावे.
- सर्व मसाल्याला तेल सुटलं कि मग त्यात चिकन आणि १ वाटी पाणी घालून, झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवावे. गरज वाटल्यास थोडं अजून पाणी घालावे.
- तुमच्या आवडीनुसार, रस्सा दाट किंवा पातळ ठेवू शक्ता.
- गरम गरम नान, फुलके किंवा पूलाव सोबत फस्त करावे!