- 790 views
चावडीतला धागा फार लांबला की त्रासदायक होतो. आणि यंदाच्या महिन्यात धागा मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढण्याची चिन्हे दिसत असल्याने दुसरा भाग केला आहे. काँपॅक्ट आणि वाचण्या - उत्तरण्यासाठी सोय म्हणून.
२५० च्या वर प्रतिसाद गेले की ३रा धागा काढावा. याच नावाचा भाग ३.
आता काही संपादकीय अपडेट्स त्या पहिल्या धाग्यावर आणि काही या धाग्यावर असे होऊ नये म्हणून उद्या मे डे नंबर १ धागा वाचनमात्र करावा.
सध्या मी माझ्याच वाड्यात ..१ या धाग्यावरचा मी मूळचा कुठल्या गावचा, सांगलीचा का? अशी पृच्छा करणारा प्रतिसाद अप्रकाशित केला आहे. मला अश्या स्वरुपाची माहिती, विशेषतः या धाग्याच्या संदर्भात जाहीर बोर्डावर द्यायची नाहीये. त्यामुळे मीत या सदस्याचे उत्सुकताशमन मी व्यनि अथवा खरडीने करेन. म्हणजे प्रतिसाद का उडवला यावर त्या सदस्याची हरकत राहणार नाही.