मखाण्यांची खिर

साहित्यः

मखाणे - १ वाटी
दुध - १ लिटर
साखर - १/४ वाटी (आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता)
तुप – 1 चमचा
काजु - ४-५
बदाम - २-३
पिस्ता - ४-५
केशर - ४-५ काड्या
वेलची पावडर - १/४ चमचा

कृती:

१. दुध १/२ लिटर होई पर्यंत आटवुन घ्यावे.
२. काजु, बदाम व पिस्ता बारिक चिरुन घ्यावे.
३. एका पॅन मधे १ चमचा तुप गरम करावे. त्यात मखाणे ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
४. मखाणे थोडे गार झाल्यावर, त्यांची मिक्सर मधे भरड करुन घ्यावी.
५. आटवलेल्या दुधामधे मखाण्यांची भरड, साखर, वेलची पावडर व केशर टाकुन ५-७ मिनिटे उकळुन घ्यावे.
६. ५-७ मिनिटांनी गॅस बंद करुन, वरुन सुक्या मेव्याने सजवावे.
७. ही खिर जास्त करुन गारच चांगली लागते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गरम खिरही serve करु शकता.

k1

k2