आपण कारवाईस कठोर का नाही?

आपण कारवाईस कठोर का नाही? आपण काहीही करायला गेलो तरी नावे ठेवणारे लोक आहेतच. मग आपण मिपावर चांगले वातावरण ठेवण्यासाठी आवश्यक अशी कठोर पावले का उचलत नाही? माझी व्यक्तिगत अडचण अशी आहे की मी मिपावर पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये. मात्र तुम्हा सर्वांजवळ अशी काळी यादी असेलच ना? मी स्वतः माझ्या नावाने कुठलीही कठोर कारवाई करू शकतो. त्यामुळे आपण यापुढे केवळ चर्चा न करता शेवटी त्याबाबत काही तरी निर्णय घेण्याची पध्दत सुरू करूया.
होतंय काय की आपण सर्व सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतोय, तर आपली सहनशीलता आपला दुबळेपणा आहे असं गृहीत धरल्याजातंय असं लक्षात येतंय. मी चुकत असेल तर मला काही म्हणायचे नाही मात्र मी जर बरोबर असेल तर मग आपण यापुढे निर्णयाप्रत पोहोचूया.
- नीलकांत