धागे 'स्टिकी' करण्याबाबत

नीलकांत,

काही विशिष्ट / उपयुक्त / माहितीपूर्ण धागे स्टिकी (sticky) करण्यात यावेत याबद्दल मी वेळोवेळी बोललो आहे तुझ्याबरोबर. त्याबद्दल विचार कर बाबा. सध्या विकास यांचा नोवार्टिस खटल्याबद्दलचा अथवा स्पाने काढलेला दुचाकी चारचाकी देखभालीचा धागा असे धागे स्टिकी असावेत जेणेकरून ते सतत वरच राहतील, त्यांची व्हिजिबिलिटी वाढेल आणि मग त्यावर सदस्य लिहितीलही. अगदीच नाही तर त्यातली माहिती इतरांना प्राधान्याने दिसत राहील. असे धागे मर्यादित काळासाठी स्टिकी करावेत (उदा. एखाद दोन महिने).

धागे स्टिकी करण्याचे अधिकार संमंकडे असावेत. तांत्रिक काम तू किंवा प्रशांतने करावे किंवा ते संमंमधे निर्णय झाल्यावर त्यापैकीच कोणी करावे.

धागे स्टिकी करण्याचे निकषही ढोबळमानाने ठरवावेत. माझ्या मते असे माहितीपूर्ण / उपयुक्त धागेच केवळ यात असावेत. अर्थात, निकष सर्वानुमते ठरवले जावेत.

सर्वांनी मत मांडावे यासाठी इथे लिहित आहे.