काही मोहक रानफुले

पावसाळा सुरू झाला कि आजूबाजूचा परिसर विविध छटांचा हिरवा रंग लेवू लागतो.
मग अवचित येतो श्रावण, रिमझिम पाऊस अन उन-पावसाचा लपंडाव घेऊन!
विविध रंगांची रानफुले माळरानांत, पठारांवर, डोंगरांच्या कुशीत बहरून येतात आणि मन मोहरून जाते.
त्यांच्या आकारांत सुद्धा किती वैविध्य! अगदी नखाएवढी छोटुकलीपण असतात काही फुलं.

हा अविष्कार आणि फुलांचा रंगीबेरंगी सोहळा बघण्यासाठी भटकंती करायला मनापासून आवडतं.
अगदी खूप लांबच जायला पाहिजे असेच काही नाही. सकाळी लवकर घरातून निघालं आणि एखाद्या जवळच्या घाटरस्त्याची वाट धरली तरी हा बहर बघायला मिळतो.
हिरव्यागार गवताच्या पात्यांवर, वेलींवर वार्‍याबरोबर डोलणारी निळी,जांभळी,लाल,पिवळी,गुलाबी,पांढरी फुले बघताना, टिपताना अगदी दोन-तीन तास कुठे निघून जातात कळतही नाही.

ह्याच मोसमात फुलणार्‍या काही रानफुलांचे हे फोटो.
(बर्‍याच फुलांची नावं माहित आहेत, काही फुलांची नावं माहीत नाहीत)

१.नभाळी (Cyanotis Cristata)ह्या फुलांचे ताटवे दूरवर पसरलेले असतात.

Nabhali

२.लाल गोधडी (Narrowleaf Indigo)

indigo

३.कानपेट (Commelina)

kanpet

४.चिरे हबॆअमरी (Habenaria Rariflora)

chire

५.नाव माहित नाही.

unknown

६.घाणेरी (Lantana)

tantani

७.घाणेरी (लाल)

tantani

८.घाणेरी (पिवळी)

tantani

९.सोनकडी (Pentanema Indicum)

sonkadi

१०.नाव माहित नाही.(Anisomeles?)

unknown

११.पिवळी पुंगळी (Obscure Morning glory )

yellow

१२.विष्णूक्रांत (Dwarf Morning glory)

dwarf

१३.संकासूर (Peacock Flower / Caesalpinia Pulcherrima)

peacock

१४.हि फूले खूपच सुंदर दिसतात.

flower

१५. याचेही नाव कळले नाही.

unknown