साखरपुडा

नमस्कार,

काल दिनांक २९.०३.२०१३ रोजी माझा साखरपुडा संपन्न झाला. ही बातमी आधी प्रशांत व आता फेसबुकने सर्वांपर्यंत पोहोचवली आहे हे ठाऊक आहे. पण तरी माझ्या तर्फे सांगतोय.

कार्यक्रम घरगुती स्वरूपाचा असावा असा आग्रह करीत करीत १२५ लोकांचा झाला. खरं तर लग्नाची तारीख मी पुढे ढकलावी या विचारात होतो त्यामुळे माझ्या आईचा व मुलीच्या वडीलांचा आग्रह होता की साखरपुडा तरी लवकर व्हावा. (म्हणजे अन्य येणारी पाहुणे मंडळींच्या चौकशी थांबतील :) ) त्यावरून मग बहिणीच्या सुटींचा विचार करता फार कमी वेळात हे साखरपुड्याचे नियोजन झाले.

कार्यक्रम छान झाला. काही फोटो सोबत जोडतोय. लग्न जुलै किंवा त्यापुढेच काढण्याचा विचार आहे. शक्यतो रविवार असेल. स्थळ अमरावती , याशिवाय माझ्या जवळ सांगण्यासारखे काही नाही. :)

लग्न या विषयावर म्हणजे लग्नातील पध्दती या विषयावर लेख लिहावा असा विचार आहे.

- नीलकांत