आमसुलाचे सार

आमसुलाचे सार नारळ घालून किवा नारळा शिवायही करतात.

साहित्य- ५/७ आमसुले किवा अर्धी वाटी कोकमाचं आगळ, एका नारळाचे दूध किवा साधारण २ वाट्या नारळाचे दूध,
१/२ हिरव्या मिरच्या,अर्धा चमचा साजूक तूप, थोडे जिरे, मीठ व साखर चवीनुसार, थोडी कोथिंबिर, पाणी
कृती- आमसुले गरम पाण्यात ३५-४० मिनिटे भिजत घाला, नंतर त्यातील पाणी काढून घ्या व उकळा.
कोकमाचा आगळ असेल तर त्यात २-३ वाट्या पाणी घालून उकळत ठेवा. उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात नारळाचे दूध घाला.(नारळाचे दूध घालून उकळले तर एखादेवेळी फाटते म्हणून कोकमाचे पाणी चांगले उकळून घ्या व नंतर त्यात नारळाचे दूध घाला.)
पळीत तूप जिर्‍याची फोडणी करुन तीत हिरव्या मिरच्या घाला व ही फोडणी सारावर घाला.
मीठ व साखर घाला. कोकमाचा आगळ आंबट असेल तर साखर जास्त लागेल.
वरुन चिरलेली कोथिंबिर घाला.

.

आमसुलाचे सार (प्रकार-२)
साहित्य- ५-६ आमसुले किवा अर्धी वाटी कोकमाचं आगळ, १-२ हिरव्या मिरच्या, तूप,जिरे फोडणीसाठी, मीठ व साखर चवीनुसार,पाणी
कृती- आमसुले गरम पाण्यात ३५-४० मिनिटे भिजत घाला.
तूप,जिर्‍याची फोडणी करुन त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
त्यात आमसुलाचे पाणी किवा कोकमाचे आगळ+पाणी घाला, चवीनुसार मीठ ,साखर घाला व चांगले उकळू द्या.
वरुन कोथिंबिर घाला.