गेले काही दिवस काही विशिष्ठ आयडी, मिपाची अॅप्रुव्हल प्रोसेस, काही आयडींचे संशयास्पद वर्तन/दंगा आणि त्यांच्यावरची बंदी ह्याविषयी अनेक मतमतांतरे वाचतो आहे.
ह्या विषयावरचा सर्व संवाद एकाच ठिकाणी उपलब्ध असावा ह्या हेतुने तसेच काही न पटलेल्या बाबी स्पष्टपणे सांगण्यासाठी मी धागा काढतो आहे. जास्त विचार वगैरे न करता १ शॉट लिहीत असल्याने धाग्यातले मुद्दे हे मुद्देसुदच असतील असा माझा दावा नाही, विचार बर्यापैकी विस्कळीत असु शकतात.
मात्र एका संस्थळाचा जुना सदस्य, स्टार वगैरे नसलो तरी बर्यापैकी चारचौघात नाव असणारा सदस्य, ह्याच संस्थळावर संस्थळद्वेष्टा तसेच पक्का मिपाकर म्हणुन संबोधला गेलेला सदस्य, इथे संपादक-सल्लागार-(काही काळापुर्वी) सर्वोच्च अॅक्सेस/राईट्स असणारा सदस्य, इतर काही संस्थळांच्या जडणघडणीचा आणि बर्याच घटनांना अॅक्टिव्ह-पॅसिव्ह साक्षीदार असणारा सदस्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अभिव्यक्तीसोबतच संस्थळाचे वातावरण मुक्त, सुरक्षित तसेच फेअर रहावे ह्याबाबत सदैव सदिच्छा बाळगणारा सदस्य म्हणुन मी इथे ४ वाक्ये लिहीत आहे. सर्वांना पटतीलच ह्याची खात्री नाही, नव्हे त्याची अपेक्षा नाही, असहमत असण्यास माझी नेहमीच सहमती असते.
असो, आता नमनालाच घडाभर तेल घालुन झाल्यावर काही मुद्द्यांविषयी सविस्तर लिहण्याचा प्रयत्न करतो.
१. चावडीची सिक्युरिटी आणि गोपनियता :
गेल्या काही दिवसात मी ह्यासंबंधी बरीच मतमतांतरे वाचली. चावडी हे दालन सिक्युअर नसण्याचा भावनेतुन पर्यायी मार्गांचा वापर किंवा तात्पुरता ह्या चावडीचा वापर बंद करण्यासंबंधी चर्चाही पाहिल्या. मी ह्या सर्व बाबींशी असहमत आहे. कारणे अनेक आहेत ...
- आंतरजालावर एकदम सुरक्षित असे काहीच नसते, मग हेच चावडीला लागु नाही का ? माझ्या माहितीप्रमाणे तांत्रिक बाबतीत आपली चावडी 'अपेक्षित' लेव्हलपर्यंत सुरक्षित आहे. इथे दुसरा कोणी इतक्या सहज घुसु शकत नाही. तरीही इथुन मजकुर लीक होऊ शकतो / होतो. त्याचीही कारणे आहेत आणि बिलिव्ह मी ह्या कारणांसाठी अनेकदा आपणच जबाबदार असतो. कित्येकदा चावडीत होणार्या चर्चेचा उल्लेख मी बाहेर गप्पातली ऐकला आहे आणि तो ही विदाऊट एनी हॅकिंग ऑर समथिंग. कारण असे आहे की माणुस हा शेवटी अपूर्नच (धन्यवाद नामु परिट आणि भाईकाका).
बाकी माझ्या माहितीप्रमाणे चावडीचा वापर आपण संस्थळाच्या भल्याबुर्या बाबींची चर्चा करताना आपला वैयक्तिक मत स्पष्टपणे लिहण्यासाठी करतो. एकदा का आपले मत पूर्ण विचारांती प्रामाणिक आणि स्पष्ट आहे अशी स्वतःची खात्री झाली तर मग हे मत समहाऊ बाहेर लीक झाले तर त्याची काळजी का करावी ? ह्या लीकेजमुळे आपले एखादे पर्सनल रिलेशन बिघडणार असेल तर त्याचा विचार आधीच करुन त्या-त्या वेळेस तटस्थ भुमिका घेऊन तसे स्पष्टपणे सांगण्यातही काही इश्श्यु नसावा. जोवर इथे आपण हेतुपरस्पर कुटाळकी किंवा कारस्थानं करत नाही तोवर कशाला घाबरण्याचे कारण नाही असे मला वैयक्तिकरित्या वाटते. आपले मत स्पष्ट बनत असेल तरच आपण ह्यात सहभाग घ्यावा आणि मग लीकेजची भिती डोक्यातुन काढुन टाकावी असे माझे तत्व सांगते आणि तसे आचरण मला अगदी आदर्श वाटत नसले तरी सुसंगत नक्कीच वाटते.
२. संशयास्पद आयडीज :
ह्यात अनेक मुद्दे आहेत, एकेक करुन लिहायचा प्रयत्न करतो.
- आंतरजालाच्या (केवळ मराठी नव्हे) स्थापनेपासुन हा प्रोब्लेम आहे, प्रत्येक संस्थळचालक त्यावर आपापल्या पद्धतीने उपाय करत असतो. सध्या मिपा जी स्ट्रॅटेजी वापरते ती मला बर्यापैकी समाधानकारक वाटते. एखाद्या आयडीबाबत 'संपादकां'नी विथ इव्हिडंसेस चर्चा करुन त्या आयडीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा हे संपुर्ण समाधानकारक आहे.
- मात्र केवळ संशय आहे म्हणुन किंवा इतर ठिकाणी त्याने काय केले काय केले नाही ह्यासंबंधीच्या बोलाचालीमधुन आपण त्याबाबत पुर्वगृहदुषित दृष्तिकोण बनवत नाही ना ह्याचा जरुर विचार व्हावा. दुसरीकडे काय केले हा क्रायटेरियाच मला अमान्य आहे. तरीही त्याचा त्रास झाल्यास आपण त्याला बॅन करण्याचा पर्याय कायमस्वरुपी खुला ठेवत असतोच, अर्थात हे सर्वच संशयास्पद आणि सामान्य आयडीजना लागु आहे. तात्या असताना असे ढिगाने संशयास्पद नव्हे तर खुल्ले ड्युप्लिकेट आयडीज होते, तात्याने ते कसे हँडल केले ह्याचे उदाहरण आहेच की.
खुद्द मलाही अनेक आयडींबाबत अनेकदा संशय येत असतो, मात्र त्याचे अनवॉन्टेड फॉलोअप ने घेता आपले काम करत राहणे मला सुसंगत वाटते कारण कोंबडे कितीही झाकले तरी ते आरवायचे रहात नाही, सबब त्या त्या संशयास्पद आयदींची सत्यता कधी ना कधी १००% बाहेर येते.
- संपादक सोडुन इतर सदस्यामधले मिपाबाबत सहानुभुती बाळगणारे अगर लेट्स से वेल विशर कितीही असले तरी त्यांच्या आणि संपादकांच्या चर्चेचा रेफ. किंवा इन्पुट्स मला इथल्या डिसीजन मेकिंगसाठी ग्राह्य धरणे बरोबर वाटत नाही. मी ही कित्येक लोकांना भेटतो, त्यांची संस्थळाबद्दल अनेक मते असतात, खुद्द संपादकांबाबत अनेकांचीए अनेक मते आहेत. पण मी ह्या भेटी/चर्चांमध्ये संस्थळाच्या धोरणासंबंधी किंवा कार्यवाहीसंबंधी 'कसलीही चर्चा न करण्याचे धोरण' शक्यतो १००% सक्सेस रेटने अमलात आणतो. अर्थात ह्याला काही अपवाद असु शकतात (माझ्याबाबत नाही, सदस्याकडुन इनपुट बाबत) मात्र अपवाद हे धोरण होऊ नये हीच काळजी.
- टु समराईझ, आपल्या धोरणानुसार मिपा हे खाजगी संस्थळ आहे आणि वेळोवेळी आवश्यक्तेनुसार एखाद्या आयडीवार योग्य ती कारवाई होऊ शकते व त्यासाठी संपादक मंड्ळ समर्थ आहे असे मला वाटते. तेव्हा आपण केवळ काही क्षुल्लक बाबींमुळे काही आयडींवर संशयास्पद हा शिक्का मारुन त्यावर इव्हिडंसेस गोळा करण्यात आपला बहुमुल्य वेळ वाया घालवु नये असे मला वाटते. जिसको मरना है वो एक दिन आपनेंहीं करम सें जरुर मरेगा ... हे सर्वच आयडीला अॅप्लिकेबाल मानावे व आपले काम चालु ठेवावे.
३. आयडी अॅप्रुव्हल आणि व्हेरिफिकेशन :
- सर्वात प्रथम मी एक स्पष्ट सांगतो की फोन नंबर, कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र, इथल्या अॅक्टिव्ह सदस्यांचे रेफरंसेस, सशुल्क सेवा(जी मिपावर नाही, अन्य कुठल्या ठिकाणी असण्याबाबत मला काडीइतके ऑब्जेक्शन नाही) वगैरे बाबी अॅप्रुव्हल प्रोसेसमध्ये अजिबात यायला नको. सदस्याचा 'निनावी' असण्याचा 'हक्क' हा अबाधितच राहिला पाहिजे.
आंतरजालावर हजारो संस्थळे ह्या तत्वांवर चालतात, तिथे भरीव चर्चा होतात आणि संस्थळ नेहमीच बहरत असते. माझ्या माहितीतल्या आणि वापरतल्या इतर संस्थळांमध्ये खुद्द संपादक किंवा सुपर मोडरेटर हे केवळ त्या 'आयडी'ची वाटचाल पाहुन त्याला 'कसलाही' ओळखीचा दाखला न मागता ठरवले जातात.
मग तिथे प्रोब्लेम्स नाहीत का ? आहेत. पण संपादन आणि सदस्यांच्या वर्तवणुकीबाबतची काटेकोर तत्वे आणि त्याचे १००% केले जाणारे पालन ही त्यांच्या यशाची सिक्रेट्स आहेत. कदाचित कुठलाच सदस्य कुणालाच ओळखत नसल्याने हे कारवाई वगैरे सोपे होऊन जात असावे. 'बाय मेकिंग रिलेशन्स वी मेक लाईफ डिफिकल्ट' हे कुठेतरी वाचलेले वाक्य इथे आपल्या त्रासाचे कारण ठरु नये असे वाटते.
बादवे, पुर्वीही बोलल्याप्रमाणे अशा संस्थळांना 'प्रतिबंधीत सदस्यांना त्यांचे म्हणणे मांडता यावे' ह्यासाठी एक खास रुम असते, जिथे ते लोक संपादकांना कन्व्हिन्स करुन आपली हकालपट्टी कॅन्सल करुन घेऊ शकतात.
असो, विषयांतर होत आहे.
मात्र संस्थळावर 'निनावी' राहण्याचा हक्क कायम रहावा ह्या आग्रहानुसार मी एप्रुव्हलसाठी कसलेली प्रिरिक्विसिट्स असावेत ह्या सुचनेच्या विरुद्ध आहे.
जर असा काही निर्णय झाला तर मी माझ्या वैयक्तिक तत्वांशी तडजोड मानुन मी हे संस्थळ सोडुन जाईन ( ह्याला कृपया धमकी समजु नये, तसा उद्देश नाही / कधीच नसणार. मात्र मी माझे म्हणणे अत्यंत स्पष्टपणे लिहीत आहे इतकेच सांगतो).
- आयपी अॅड्रेस आणि इतर लॉगीन डिटेल्स (ईमेल वगैरे) :
काही अत्यंत आवश्यक आणि बहुमतानुसार संशयास्पद ठरवलेल्या गेलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यापुर्वी जस्ट एक क्रॉस-चेक म्हणुन त्या आयडीचे आयपी / ईमेल आयडी वगैरे बाबी तपासाव्यात. अन्यथा ही गोष्ट आपली रुटिन प्रॅक्टिस नसावी. ह्याला मी त्याच्या 'निनावी' हक्कांचे उल्लंघन मानतो.
काहीवेळा काही कारणांमुळे अनेक आयडींचे आयपी सेम येऊ शकतात.
उदा : मी, माझे कुटुंबिय आणि माझे काही मित्र मिपावर आयडी घेऊन आहोत. माझ्या तत्वांनुसार मी माझ्या ब्राऊजरचा कॅश कधीही क्लीन करत नाही, हे तत्व माझ्या बहुसंख्य मित्र आणि कुटुंबियांना माहीत आहे व ते त्याचे पालन करतात व माझ्या मशिनवर बिनधास्त मिपासकट इतर अनेक वेबसाईट वापरतात. मग उद्या तुम्हाला माझ्या आयपीवर इतर आयडीज फ्लॅश झाले तर तुम्ही मलाही संशयाच्या पिंजर्यात उभे करणार का ?
उद्या माझी एखादी मैत्रिण माझ्या पिसीवरुन तिचे स्त्री सदस्य नाव अॅक्सेस करत असेल तर तुम्ही त्याला छोट्या डॉनचा ड्युप्लिकेट स्त्री आयडी म्हणणार का ?
तुम्ही मला त्याचे स्पष्टीकरण मागणार का ? मी माझ्या तत्वांशी आणि मिपासोबत असणार्या सदिच्छेशी संपुर्ण प्रामाणिक आहे अशी माझी खात्री असल्याने हे स्पष्तीकरण माझ्यावर अन्याय नाही का ?
असो, हे जस्ट एक प्रॅक्टिकल उदाकरण आहे (कृपया माझ्या आयपीवरचे स्त्री आयडी चेक करायला जाऊ नये, तो एक प्रॅक्टिकल जोक होता. धन्यवाद) ;)
असो, तूर्तास इतकेच. बाकी जमेल तसे आणि पटेल तसे.
अनावश्यक, बेसलेस किंवा काही उणे-अधिक लिहले आहे असे वाटत असल्यास त्या त्या संबंधितांची आत्ताच प्रामाणिकपणे क्षमा मागतो.
- छोटा डॉन