डाल रस्सम

साहित्यः

तुर डाळ - १/२ वाटी
मुग डाळ - १/२ वाटी
टोमॅटो - १
कडिपत्ता - ४-५ पाने
धणे - १/२ चमचा
जिरे - १/२ चमचा
काळी मिरी - १/२ चमचा
मोहरी - १ चमचा
हिंग - १/२ चमचा
चिंचेचा कोळ - १ चमचा
हळद - १/४ चमचा
लाल तिखट - १ चमचा
तेल / तुप - १ चमचा
कोथिंबीर सजावटीसाठी
मिठ चवीनुसार

पाकॄ:

१. तुर डाळ व मुग डाळ धुवुन, १/२ तास भिजवुन ठेवावी.
२. कुकर मधे भिजवलेली डाळ व चिरलेला टोमॅटो लावुन, ४-५ शिट्ट्या होऊ द्याव्या.
३. कुकर झाल्यावर, डाळ व टोमॅटो mash करावे. त्यात २ कप पाणी टाकुन mix करुन १/२ तास बाजुला ठेवावे. त्यामुळे डाळ खाली बसुन, रस्सम साठी डाळीचे पाणी मिळेल.
४. तव्यावर जिरे, धणे व काळे मिरे भाजुन, त्याची पुड करुन घ्यावी.
५. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, कडिपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट व भाजुन केलेली पुड टाकुन परतुन घ्यावे. त्यात डाळीचे पाणी ओतावे.
६. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ व चवीनुसार मिठ टाकुन ३-४ मिनिटे उकळु द्यावे.
७. कोथिंबीरने सजवुन गरमा गरम रस्सम पिण्यासाठी तयार आहे.
८. रस्स्म तुम्ही साध्या भातासोबत खाऊ शकता किंवा सुप म्हणुनही पिऊ शकता.
९. आवडत असल्यास तुम्ही रस्समला वरुन परत मोहरी व कडिपत्त्याची फोडणी देऊ शकता.

gj

ih