नविन उपक्रम!

नमस्कार,

येत्या फेब्रुवारी महिन्यापासून दोन नविन उपक्रम करायचा विचार करतोय, त्यासाठी नीलकांत आणि प्रशांत दोघांशीही एकदा बोललो आहे.

आर.के. लक्ष्मण यांनी टाईम्स ऑफ इंडियाततून प्रसिध्द केलेल्या कॉमन मॅनच्या व्यंगचित्राच्या सदरासारखंच एक व्यंगचित्राचं सदर मिपाच्या मुख्य पानावार सुरू करायचं आहे जे दर आठवड्याला अपडेट होत राहील. व्यंगचित्रासाठीचा विषय त्या त्या वेळेला मिपावर सुरू असणार्‍या गोंधळाला समोर ठेऊन निवडण्यात येईल. अथवा संपादक मंडळाच्या संमत्तीनुसार या सदरासाठी मिपाबाह्य विषयही घेऊ शकतो. व्यंगचित्रासाठी ब्वॉर्रर्र..! असं शीर्षक सध्या तरी ठरलेलं आहे. हा आगळावेगळा उपक्रम अर्थातच जबरदस्त कलाकार असलेल्या अभिजीतने सुचवलाय.

मिपावरील लेखनात बर्‍याच चांगल्या लेखमालिका होऊन गेल्या आहेत, उदा. बिकांची माझं खोबार, गविंची दास्तान्-ए-आवारगी, टिम गोवाचे आमचे गोयं, विनित संखेने टाकलेली करण आणि फ्रेंड्स अशा सर्व चांगल्या पण पुर्ण झालेल्या(हे एवढ्यासाठीच टाकतोय कि रामदास काकांच्या काही लेखमालिका अजूनही अपुर्ण आहेत, आणि हे वाचून कदाचित ते त्या मालिका पुर्ण करतील. ;)) लेखमालिका निवडून त्या ई-बुक स्वरूपात मिपाच्या मुख्य पृष्ठावर ठेवाव्यात जेणेकरून नविन असणार्‍या/ पहिल्यांदाच येणार्‍या वाचकाला त्या मालिकांचा एकत्रितपणे आस्वाद घेता येतील. प्रत्येक ई-बुक्स एका छानश्या सजवलेल्या मुखपृष्ठासह मिपाच्या मुख्य पानावर झळकलं तर खुप मजा येईल. अशा चांगल्या लेखमालिका निवडण्यासाठी अर्थातच आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे, किंवा यासंदर्भात एखादा धागा बोर्डावर टाकून बाकिच्या सदस्यांचीही मदत घ्यावी काय?

एचटिएमएलचा त्रास नीलकांतने संपुर्ण संपवलेला आहे पण ती साईट अप होण्यासाठी कमीत कमी ५-६ दिवस लागतील. एकदा का ती साईट अप झाली कि ई-पुस्तकाच्या या उपक्रमाला सुरूवात करायची आहे. या दोन्ही उपक्रमांची सगळी कामं अभिजीत आणि मी स्वत: करणार आहोत.

तर अशा या दोन्ही नविन उपक्रमांसाठी तुम्हा जेष्ठ/श्रेष्ठ लोकांच्या सुचना आणि अभिप्रायांची गरज आहे.

(आपणा सर्वांच्या मदतीच्या प्रतिक्षेत असलेला मिपाचा सर्वात तरूण संपादक ;)) किसन