अलिबाग . . .

मागच्या रविवारी अचानक मनात आले की कुठेतरी भटकायला जावे . . .लगेच प्लॅन केला. . .राजेसाहेबांना फोन केला आणि ते घरी आहेत याची खात्री केली. . .परंतु जायचे होते अलिबागला! राजेसाहेब सहज येतील अशी खात्री नव्हती. . .म्हणून सरप्राईझ ट्रिप ठरवली. . .राजेसाहेबांना सांगितले की आपल्याला लोणावळ्याच्या पुढे एका स्पॉट ला जायचे आहे. . .राजेसाहेब तयार झाले.

पेणला आल्यावर राजेसाहेबांना कल्पना दिली की आपण अलिबागला जावून परत येऊ शकतो. . .राजेसाहेबांनी होकार दर्शवला.
मग पेणला नाष्टा करून अलिबागच्या दिशेने रवाना झालो.

किनार्‍यावर गेल्यावर फोटो काढणे सुरुच होते. . .शेजारून लोक घोडा-गाडीवरून समोरील किल्ल्यावर जात होते.
त्यातील एका घोडागाडीचा फोटो खाली लिंक करत आहे.

.

समोर दिसणार्‍या सूर्याचा आणि वाळूवर दिसणार्‍या परावर्तीत किरणांचा फोटो काढला. तो खाली लिंक करत आहे.

.

पुढे गेल्यावर समोर एक किल्ला पहायला मिळाला.
चौकटराजा 'साहेब' म्हणाले समोर किल्ला आहे त्यामुळे आपल्याला परफेक्ट सूर्यास्त मिळणे कठीण आहे. . . म्हणून मग पुढे जावून एखादा छान अँगल मिळतो का ते पाहू लागलो. . .तेवढ्यात एक छान अँगल मिळाला. तो खाली लिंक करत आहे.

.

परतीचा प्रवास सुरू केला. . . वाटेत खोपोलीमध्ये थांबून एक्सप्रेस वे वर शटरस्पीड फोटोग्राफीचा प्रयत्न केला.
त्यात काढलेला फोटो खाली लिंक करत आहे.

.

यानंतर सरळ होम स्वीट होम तेपण १०.३० वाजता.