हा धागा वाचल्यावर आठवले कि आपणहि काहि महिन्यांपुर्वी अलिबागला जाउन आलो आहोत आणि छायाचित्रेही काढली आहेत. पण त्यावेळी वेळ नसल्याने अथवा काहि कारणाने मिपावर टाकणे राहुन गेले.
मी गणपतीच्या काळात (२०१२) पुणे-अलिबागला एक चक्कर टाकली होती त्या दरम्यान अलिबागला काढलेले हे काहि फोटो. गणपतीच्या ५व्या दिवशी हे फोटो अलिबागच्या समुद्र किनार्यावर काढलेले आहेत.
१. अलिबागच्या किनार्यावर सुर्याचा अस्त!
नुकतेच एक विमान आकाशात धुराची मोठी रेषा सोडुन गेले होते तिच या फोटोत दिसत आहे....
२. अलिबागच्या किनार्यावर सुर्याचा (अजुन एक) अस्त!
३. जड अंत:करणाने बाप्पाचे विसर्जन करुन परतणारा एक भाविक, सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर
४. एक धवलकृष्ण सुर्यास्त!
५. बाप्पांना निरोप देण्याआधी आरती!
६. बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला!
७. फुगेवाल्याने वाळूत रोवलेले फुगे
९. अलिबाग आणि आसपासच्या गावातील घरगुती गणपती
१०. घरच्या गौरी आणी गणपती
चला मंडळी आता निरोप घेतो (वास्तविक पाहता अलिबाग मधुन आमचा पाय निघता निघत नाहि!)























