नमस्कार, मी मिपावरची नविन सदस्या आज माझ पहिल कलादालन सादर करत आहे. मी सध्या साऊथ अफ्रिकेत आहे माझ्या यजमानांसोबत. मी इथे काही फोटो काढली आहेत. मला फोटोग्राफीची आवड इथेच निर्माण झाली. त्यातलीच काही फोटो मी इथे टाकत आहे.
१. पाणी ही जगाच्या काही भागात खुप मोठी समस्या आहे पण अशा या समस्येपासुन विलिप्त असा हा तहानलेला कबुतर एका छोटयाश्या पाण्याच्या खडग्यावर बसुन तहान भागवत आहे.
२. पाऊस येण्याच्या आधी आकाशात काळेभोर ढग दाटून येतात,गार वारा सुटायला लागतो,सुन्दर असा निसर्ग मनाला आनंद दयायला लागतो,अशाच निसर्गाचा आनंद पिवळी चिमनी जिला साऊथ अफ्रिकेत विवर बर्ड म्हणजे सुगरन पक्षी म्हणतात ती पण घेते आहे.

३. साऊथ अफ्रिकेत पिलानेसबर्ग म्हणून एक जंगल आहे. आम्ही तिथे स्वतःच्या कार मधे बसून एखादा प्राणी दिसावा आणी त्याची फोटो घ्यावी याची वाट बघत होतो. त्या दिवशी आभ्र पडलेल होत. बराच वेळ झाला होता काही दिसत नाही होत. तेवढयात हरिणांचा कळ्प दिसला. अचानक ती पळायला लागली,कळल नाही की काय झाल पण तेवढयात मला त्यांच्या मागे एक सिंह येतांना दिसला. हळू हळू तो आमच्या खुप जवळ आला. त्याला त्याची शिकार तर मिळाली नाही पण आम्हाला तो खुप जवळुन बघायला मिळाला आणी आम्ही त्याची भरपुर फोटो काढली. प्रत्यक्षात अस दॄश्य बघुन छान वाटल. हा खुप छान अनुभव होता.
