कोल्हापूर

1

shivling opp.wadi

opp wadi

shivalay

kalayogo kamble

dwar

shirol bhojan patr mandir

deep stambh

baheril nandi

mukhya dwar

shivalay

कोल्हापूर.कलानगरी.मी इथे गेलो आणि हरखून गेलो.मुख्य कारण मला येथे भेटलेली माणसे.जी काही भ्रमंती केली आज पर्यंत त्यात कोल्हापूरकर अतिशय आवडले.निदान मला तरी त्या तीन दिवसात अतिशय चांगली माणसे मिळाली.आपुलकीने वास्तपुस्त करणारी.काही माहिती विचारली तर लगेच मदत करणारी.जशी आधी पासूनची ओळख आहे अशी वागणारी.

महालक्ष्मी मंदिरामागे माउली लॉजवर उतरलो होतो.तिथले मालक आणि त्यांचे व्यवस्थापक श्री.काणे यांनी कोण कुठले याची चोकशी केली.मग म्हणाले आमच्या ओळखीचा रिक्षावाला देतो योग्य दरात तुम्हाला ठिकाणे दाखवील.मग रिक्षावाले बाबासाहेब भेटले.''साहेब उद्या बरोबर आठला तयार राहा.मी येतो''.मग दोन दिवस या माणसाने मला सर्व ठिकाणे जी मला पहायची होती ती आणि काही अशी जी सगळे लोक पाहतातच असे नाही,कारण त्यांना माहीतच नसते.तर ती ठिकाणे मला या बाबासाहेबांमुळे पाहता आली.

त्यात शिवालय-कैलासगडाची स्वारी मंदिर.या मंदिरा बाहेर बावीस फुटी अश्या दोन समया,दाराबाहेर बसलेला पितळयाचा एक टनी भरीव नंदी.पितळ्याची नक्षीकामयुक्त दारे.आत चांदीची सजावट.आणि गाभार्यात लावली आहेत चत्रा चित्र महर्षी कांबळे यांची तैल चित्रे.श्री कांबळे यांच्याबद्दल रिक्षावाल्यानी माहिती दिली ती ज्यांना माहित नाही त्यांच्याकरता देत आहे.कांबळे देवळात जात नसत.म्हणजे देव देव करणारे नव्हते.त्यांना शिवाजी महाराजांचे चित्र काढायचे होते पण राजा ना तर पहिले नाही मग कसे काढावे?या विचारात होते.त्यांना कुणी स्नेह्याने इथे आणले आणि सांगितले या देवाचा आशीर्वाद घे काही तरी नक्कीच सुचेल.त्यांनी पिंडीला हात लावून नमस्कार केला तर त्यांना ती थोडी नरम म्हणजे कुणा माणसाच्या त्वचे सारखी जाणवली.मग ते इथे नेहमी येऊ लागले.

nandi

rath

एक दिवस त्यांना स्वप्नात देवाने सांगितले तुला राजांचे चित्र काढायचे आहे आणि त्यांना तू पहिले नाहीस म्हणून अडलंय न मग बघ असे होते राजे.आणि त्यांना शिवाजी महाराज दिसले.त्यांनी लगेच चित्र काढले,लोकांना खूप आवडले.कालांतराने सरकारला पाठ्य पुस्तकात आणि सरकारी कचेर्यात लावायला राजांचे चित्र हवे होते.कोल्हापूरवासियांनी यांचे चित्र आग्रहाने पाठवले.अनेक चित्रात ते निवडले गेले.पण सरकारने यांना म्हटले कि हे चित्र आम्ही एका डच कलाकाराने राजाना समोर बसवून काढलेले चित्र आहे हॉलंड येथे त्याच्याशी जुळवून पाहू मग घेऊ.आणि दोन्ही चित्रे अगदी जुळली.मग सरकारने यांना काही कोट रुपये रोयलटी म्हणून देऊ केले ते यांनी घेतले नाही.म्हणाले मी राजाना पहिले नाही देवाने दाखवले मी कसे पैसे घेऊ.आपण पुस्तकातून पाहतो ते राजांचे चित्र इथे आहे.

rajyabhishekh

raje

एक महाभारतातील गीता सांगितली तो विश्वरूप दर्शन प्रसंग आहे त्यात रथाचे चित्र कांबळे यांनी काढलेले लावलाय. यातील रथ जसे आपण पुढे मागे होतो तसा आपल्याकडे फिरताना दिसतो.राज्याभिषेक प्रसंगाच्या चित्रात प्रत्येक माणूस स्पष्ट दिसतो आणि फक्त मासाहेब आपल्या हालचाली बरोबर मान फिरवताना दिसतात.तीच गोष्ट शंकराच्या गळ्यातील नागाची.जरूर पाहून या.या कांबळेचे सुपुत्र नेमके तेव्हा आले.रिक्षावाल्यांनी ओळख करून दिली.लगेच तो माणूस मला घरी घेऊन गेला.त्यांनी काढलेली चित्रे दाखवली.अगदी वडिलांसारखेच प्रतिभावान.खूप बोलले.मुघले आझमची पोस्टर कांबळे यांनीच काढली होती.

shankar

shivasamadhi

ती पाहायला राणी विक्टोरिया सुद्धा थबकून पाहत राहिली असे कळले.मग आणखी एक मंदिर पहिले.याचे वेगळेपण म्हणजे नंदी आत आणि शंकर बाहेर आहे.आणि गुरुचरित्रात कथा आलीय.त्या घरात गेलो.दोन्ही ठिकाणी त्यांचे वंशज भेटले.एक शिरोळ आणि वाडी समोर पलीकडे छोटे घर आहे तिथे आजी आजोबा आहेत.या दोन्ही घरात दत्तात्रयांनी दिलले शिवलिंग आणि हाताचा ठसाआहे.ठसा शिरोळ आणि लिंग वाडी समोरील तीरावर.

ju.kamble.

vanshaj

लांबलचक झाल्याने आवरते घेतो.आणि हो दावणगिरी डोसा खाल्ला.मुठीने तो करणारा माणूस लोणी सोडत होता डोश्यावर.सांबर चटणी हवी तेवढी.वेगळी चव आहे.खून पहा .येताना घेतलेली विंचू काटा चप्पल अजूनही करकर वाजतेय.