झाडांची आवड तर बहुतेकांनाच असते पण ती लावायला कधी जागा नसते, तर कधी त्यांची जोपासना करायला वेळ नसतो. मुंबईत तर ग्रिल मध्ये, बालकनी असेल तर त्यात झाडं लावून लोकं आपली आवड जोपासतात. मग जर आपण शोभेच्या झाडांबरोबर भाज्या, मसाले (मिरच्या कोथिंबीर पुदीना, पाती चहा) लावले तर आपल्याला घरच्या घरी ते मिळतील. त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्याचा अनुभव मी घेत आहे. तुम्ही पण तो अनुभव घेऊन बघावा. त्यासाठी काही जास्त पैसे खर्च होत नाहीत. तुम्ही बाजारातून कधी पुदीना आणलात त्याच्या काड्या फेकून न देता त्या मातीत खोचून ठेवा. तुम्हाला भरपूर पुदीना मिळेल. कढीपत्ता पण कोणाकडून रोप आणून लावू शकता. लसूण सोलून त्याचा निमुळ्ता भाग वर ठेवून बाकीचा भाग मातीत खोचला तर सुंदर लसणाची पात चटणी साठी मिळेल. मी लावलेल्या झाडांचे काही फोटो संलग्न करीत आहे. तुम्ही पण नक्की प्रयत्न करुन बघा.