दिवाळीच्या सुट्टीत ४ दिवस गोव्याला जाण्याचा योग आला. सिजन एकदम फुलऑन होता. रस्त्यांवर मुंबईच्या वर ट्राफीक आणि त्याच्या दुपटीने पदाचारी. वाहतुकीचे नियम नेहमी प्रमाणे फाट्यावर मारणारे चालकवर्ग आपल्याच मस्तीत अस एकंदरीत (अंधा) धुंद वातावरण. त्यात सोबतच्या मीत्रांच्या आवडी वेगळ्या त्या मुळे भटकंती मनाजोगती करता आली नाही ह्याच शल्य घेउनच परत एकदा निवांत गोवा करायच ठरवुन माघारी आलो. जाताना आम्ही पुणा-कोल्हापुर-निपाणी-संकेश्वर- गडहिंग्लज-अंबोलि मार्गे गोव्यात पोचलो. परतीचा प्रावास वेंगुर्ला-सावंतवाडी-गगनबावडा-कोल्हापुर-मुंबई असा केला.
गोव्याच्या आगदी उलट ईथल वातावरण एकदम शांत परीसर, निवांत लोक, सुंदर निसर्ग हे पाहुन एक रात्र वेंगुर्ल्यातच मुक्कम ठोकला. लॉज मालका कडुन जुजबी माहीती घेतली आणि पुढिल भटकंतीसाठी गोवा रद्द करुन मनोमन वेंगुर्ला परीसर निवडला. वेंगुर्ला केंद्रस्थानी ठेऊन तुम्हाला तेरेखोल, तारकर्ली, मोचेमाड ई. ठिकाण पाहता येतील.(भटक्यांनी या यादीत आधिक भर घालावी ही विनंती.)
गोव्यातील काही प्रकाश चित्रे
१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५

क्रमशः
कॅमेरा निकॉन डी९० + लेन्स निकॉन १८-५५ व निकॉन १०५