शुभेच्छा आणि अभिनंदन!

नमस्कार चावडीसदस्यांनो,

सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटूंबियांना, ही दिवाळी आणि येणारे वर्ष सुखसमृद्धीचे जावोत ही मनःपूर्वक शुभेच्छा!

मध्यंतरी खूपच व्यस्त असल्याने जरी अधूनमधून पिंक टाकायला आलो असलो तरी येणे जमत नव्हते. तरी देखील गैरसमज नसावा, तसेच, असे गप्प दिसलो आणि काही तातडीने मदत हवी असल्यास हक्काने संपर्क करावा. मात्र त्यामुळे या पहील्यावहील्या दिवाळी अंकात लेख देण्यासाठी अथवा इतर मदत करता आली नाही म्हणून क्षमस्व! मात्र तुम्ही सर्वांनी खूपच जोमात काम केले आहे, तसेच टीमस्पिरीटमधे सगळे संपादनाचे काम करत असल्याने तुम्हा सर्वांचे अभिनंदन!

हेन्रीफोर्डचे एक वाक्य कायम आठवते, "coming together is beginning, keeping together is progress and working together is success" . आज मिपाचे या यशाबद्दल अभिनंदन! :-)