गुर्‍हाळ लावलय गुर्‍हाळ....

या हो मंडळी... गोडखाऊ...साखरखाऊ...गुळखाऊ.... या हो या....

अशी जोरदार हाळी द्यावीशी वाटल असं ठिकाण बगितलं आंम्ही..http://www.misalpav.com/node/23073 पांडवेश्वर दौर्‍याहुन परतताना. अगदी येक नंबर जागा बघा... येकदम मेमरेबल. त्याचं काय हे ना,गुर्‍हाळ मंजे गावकडच्या पब्लिकला म्हाइत असनारी गोष्ट...! पन शेराकडल्या मानसास्नी ह्ये असलं काय बगाया मिळालं,की ल्हान पनी जत्रेत बापाकडनं न मागता जंबो मिळायागत आनंद हुतो बगा...म्हनुन आज आपुन त्येची सफर करायची. अता तसं म्हनाया ग्येलं तर ही जागा,मंजी गुर्‍हाळात इशेष त्ते क्काय,यितक उलगडून सांगन्या सारखं??? असा ट्नाक उसा सारखा आपटल्या बिगर न फुटनारा प्रश्न पडू शकतोच की...!
हा...पन हितच तं सग्ळी गोम हाय वो...! जरा आमचं ह्ये गुर्‍हाळ बगा तरी कसं हाय,येवढं लांबरुंद् आनी म्होटं चरंखं बगाया घावतं काय तुमच्या शर्‍हात...? न्हाय ना? मग बगा कसा हाय ह्यो चरका..म्होट्टाच्या म्होट्टा...उसच काय येळ पडली तर... ;-)
https://lh3.googleusercontent.com/-8yMQrBxc4FQ/UJuPSpuxprI/AAAAAAAABzw/nCcnoYCGk9k/s640/Photo-0255.jpg
असो... तर ह्या गुर्‍हाळाची गंम्मत सुरु व्हती ती आपुन गाडी रोडच्या साइडला सोडल्या पास्नं... गाडीतनं खाली उतरेपर्यंत ह्ये ना मंडळी, त्या रसाचा अस्सा काही खमंग आनी गो...ड वास सुटतो,की असं वाटतं त्या गुर्‍हाळात जाऊन गुळ खान्या परास ह्यो वासच खात र्‍हावं...! त्याच नशेत आपन म्होरं सरकल्याव, वेंट्रीला दिसते ती ही सगळी पडल्याली सुक्या चिपाडाची रास,,,
https://lh3.googleusercontent.com/-_44z4h3qG2Y/UJuMMbEKYRI/AAAAAAAABy8/SiH82jcJe8A/s640/Photo-0249.jpg
https://lh4.googleusercontent.com/-UPuMr3_FX_M/UJuNCGXQ1SI/AAAAAAAABzE/YKfGzI2CnV4/s640/Photo-0250.jpg
आनी गाळायच्या पेश्शल उसाचा खच...
https://lh6.googleusercontent.com/-PRo1bCBCi5Q/UJuO9cnZS3I/AAAAAAAABzk/ixyLK_984Jo/s640/Photo-0254.jpg
अता जाऊ आपन गुळ कराच्या म्हा... रेशिपिकंड...
सग्ळ्यात आंदी त्यो सॉर्टिंग क्येलेला उस व्हता न्हवं का,त्यो ह्या म्होट्या चरक्यात जातु..
https://lh3.googleusercontent.com/-5Wz2tCmnORA/UJuPuS0edRI/AAAAAAAABz4/KLVs4Er3yjY/s640/Photo-0256.jpg
काय पट्टा फिरावनारी मोटार दमदार हाय बगा मंडळी...
दुपारच्या टाय्माला कडाडून भांडनार्‍या बाईच्या तोंडाचा पट्टाच जनु...
https://lh3.googleusercontent.com/-BPStTVALaE4/UJuSbntFjfI/AAAAAAAAB0w/GU9uPMDvtL0/s640/Photo-0257.jpg
https://lh3.googleusercontent.com/-VKk8cmUqzEw/UJuWwStOp9I/AAAAAAAAB2o/r1BL_iwq84w/s640/Photo-0275.jpg
तर अश्या ह्या दमदार मोटर असलेल्या चरख्यात ऊस मंजी, जेवनात कचाकचा खाल्लेल्या कांद्या सारका जतोय बगा...आनी नंतर मग त्येचा काळाकभिन्न म्हनावा,पन मुळचा आमच्या इटुरायासारखा गोड असावा,असा रस ह्या हौदात सोडत्यात बरं...!
https://lh3.googleusercontent.com/-Eb62imRcRQc/UJuW4y8YOcI/AAAAAAAAB2w/w9TXE-vKcOY/s512/Photo-0276.jpg
आन मग त्यो रस फुडं जातो तो ह्या तिन कडईच्या ओपन बॉयलर मदी...
https://lh6.googleusercontent.com/-ROJ17SbOWrg/UJuVbrW0dCI/AAAAAAAAB2I/R8AbSc0aLks/s512/Photo-0270.jpg
हा पन ह्या बॉयलरची येक गंम्मत दाकवायची र्‍हाइल बर का.. ती दावतो आदी... त्या अदुगर ह्ये पोरगं बगा बंरं काय करु र्‍हायलय...
https://lh5.googleusercontent.com/-UOaTRxk4bSE/UJuSvX5YM2I/AAAAAAAAB1A/FkNvetTH6_o/s640/Photo-0260.jpg
मला बी पयल्यांदा त्येच वाटलं की भुश्श्यात पोरगं करतय तरी क्काय??? जवळ जाऊन नीट बगितलं तर काय?,,,आहो...अलम मानसाच्या जातीचा अवडता ख्येळ चाल्लावता त्याचा... त्या तीन कढयांच्या असलेल्या बॉयलर खालच्या आगीत-काड्या सारत होतं पोरं....!
https://lh6.googleusercontent.com/-OdIOor0oG8M/UJuTIcJtkOI/AAAAAAAAB1Q/OLHKX6LRdvg/s640/Photo-0262.jpg
हाय का न्हाय इब्लिस ब्येनं... मी ग्येलो जवळ बगाया तरं मला,,''पडशीला आत'' असं हसत म्हनलं ल्येकाचं...!
त्येला बखोटिला धरुन दूर सारलं आनी बगितलं,तर खाली काय हो त्यो जाळ... बाब्बो...! जाळ कसला?अगदी खर्राखुर्रा तिखट जाळ...! उगीच रसाला गुळाकड न्येतो व्हय तो...
जाऊ दे अता आपन पुन्ह्यांदा वर जाऊ...कढयां कडं,तर ह्या लाइननी ३ कढया...यातल्या फय्ल्या कडईत रस येऊन पडतो,तो हळू हळू अळायला सुरवात हुती,काळे पना बी जराजरा कमी होऊन आक्शी वाटलेल्या मेंदिवानी हिरवट व्हाया लागतो.
https://lh4.googleusercontent.com/-vfNFshPGCpg/UJuTQneWzAI/AAAAAAAAB1Y/b9Dk6cc7qw4/s512/Photo-0264.jpg
त्येच्या नंतर या दुसर्‍या कढईत त्येला ढकलतात,आनी थितंत्येच्या मदी प्रक्रीया होन्यासाठी कसलं तरी वंगान त्यात घालत्यात,त्यानं मळी खाली बसती आनी रस अज्जून फ्रेश मंजी सफेद हुतो.
https://lh6.googleusercontent.com/-uiZ0LJ64zh4/UJuTi3Nv9SI/AAAAAAAAB1g/-RELQT-xzPQ/s512/Photo-0265.jpg
आनी थितं त्यो रटारटा उकळाया लागुन,फ्येस सोडाया लागला...की त्याला लग्गेच हल्लीच्या शैक्षनिक धोरना परमानं भराभर फुडं ''पास'' करत्यात...
https://lh3.googleusercontent.com/-Xrj8RQJhmPM/UJuTtZRCSXI/AAAAAAAAB1o/72YpfQSs9Us/s512/Photo-0266.jpg
हां.............पन ह्या श्येवटच्या यत्तेत सग्ळ्ळा घाम निग्तो बर्का...! ह्या तिसर्‍या कढईत रस चांगला इत इत खाली जाईपरेंत कडतो...! येकदम कढुन कढुन केशरी रंग धारन क्येल्या बिगर सोडत न्हाईत ब्येन्याला...!
https://lh4.googleusercontent.com/-6gkdirx034c/UJuUvpKuGAI/AAAAAAAAB2A/uxHMqYLZFZE/s512/Photo-0269.jpg
आनी मंग त्येच्या कडच्या पन्हाळीतनं उकळता गुळ,फुडं येका चौकोन्हात ढ्येपा करायला सोडत्यात... आला गरम गरम गुळ,की वोढ फावड्यानी आनी भर ढेपाच्या बादलीत(साच्यात) अस्सा सपाटा लागुन र्‍हातो बगा...
https://lh6.googleusercontent.com/-h4Qk5S6sTIM/UJuUg3pPjmI/AAAAAAAAB14/vnAA9Zb5iZU/s512/Photo-0268.jpg
https://lh5.googleusercontent.com/-PL1b2VWpxXo/UJuUJuE_zeI/AAAAAAAAB1w/szJ3MJ5GhGA/s640/Photo-0267.jpg
आनी मंग ह्यो भगवंताच्या रसाळ अभंगा सारखा गोड गुळ तय्यार होतो,तो आपल्याला थितं गरम गरम खाया मिळन्यासाटी,,,
https://lh6.googleusercontent.com/-jmAqmc0w-yw/UJuWdOz-dmI/AAAAAAAAB2Y/UWAG8wH7xtM/s640/Photo-0272.jpg
आनी बाजारला जान्या साटीही...
https://lh4.googleusercontent.com/-mvRl0nuezrQ/UJuV0OF0pFI/AAAAAAAAB2Q/4-sr82dVffs/s640/Photo-0271.jpg
मंग काय मंडळी कसं वाटलं आमी लावलेलं गुर्‍हाळ,,,हाय का नाय त्येच्यातल्या गुळावानी गोड....??? :-)
======================================================================================
प्रस्तुत ठिकानी आमी क्येल्येलं व्हिडो री-पोर्टिंग... खास पण्णास रावांच्या http://www.misalpav.com/comment/435394#comment-435394 आग्रहास्तव ;-)