दिवाळी अंकाबाबत अत्यंत महत्वाचे..अर्जंट..तातडीचे..इत्यादि..

हा धागा एका खास उद्देशाने काढला आहे.

पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने केलेल्या जबरदस्त फॉलोअपमुळे आपल्याकडे दिवाळी अंकासाठी साधारण वर्ड फाईलची तीनशेहून जास्त पानं इतका मजकूर वेगवेगळ्या चॅनेल्समधून (व्यनी, ईमेल इत्यादि) जमा झालेला आहे.

त्याचं प्रूफरीडिंग श्री. सुधांशू नूलकर हे भले गृहस्थ करताहेत. निम्म्याहून अधिक करेक्शन पूर्णही झालं आहे. बाकीची प्रक्रिया चालू आहे. आता वेळ कमी उरला आहे.

दिवाळी अंकाचे प्रास्ताविक / संपादकीय / ऋणनिर्देश या प्रकारच्या लेखाविषयी मी आणि रामदासकाका चर्चा करत असताना असं जाणवलं की विशेषतः ऋणनिर्देशात अनेक नावं विसरली जाण्याची शक्यता असते. यासाठी सर्व संपादकमंडळाची मदत मला हवी आहे. अंकासाठी आपण जो फॉलोअप केला किंवा अन्य कृती (प्रूफ रीडिंग करुन घेणे, टाईप करुन घेणे, फोनाफोनी करणे, रेखाटन, डिझाईन, बाह्य व्यक्तीचा संपर्क करुन देणे, अन्य कोणत्याही मार्गाने खूप मोठा किंवा अगदी थोडासाही का होईना पण मदतीचा हात पुढे करणे) केली त्यामधे सामील असलेल्यांच्या नावांची आपापली यादी या धाग्यात द्यावी.

या यादीखेरीज अजूनही एक हवं, ते म्हणजे प्रास्ताविकात आपापल्या बाजूने / आपापल्या मते आले पाहिजेत असे मुद्दे. तेही प्रत्येकाने इथेच लिहून मला एकत्र करायला मदत करा. पहिलाच अंक आहे. त्यामधे कोणाचाही पॉईंट ऑफ व्ह्यू राहून जायला नको आहे.

उदा.

-पाच वर्षांत दिवाळी अंक काढला नाही आणि आता काढला याविषयी टिप्पणी देणं गरजेचं आहे.
-अपेक्षेपेक्षा खूप जास्त साहित्य आलं, म्हणजे प्रतिसाद भरभरुन आला हे लिहीणं गरजेचं आहे.

असेच आणखी बरेच मुद्दे असतील की ज्याचा आवर्जून उल्लेख होणं उचित दिसेल. तेव्हा आपापले मुद्दे इथे द्यावेत अशी विनंती करतो.

आणखी एक महत्वाचं म्हणजे, आपण ८ नोव्हेंबरपर्यंत अंक रिलीज करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यामुळे पुढच्या चोवीस तासात आपल्यापैकी बहुतेकजण एकदातरी मिसळपाव अ‍ॅक्सेस करतील असं गृहीत धरुन भारतीय वेळेप्रमाणे परवा (मंगळवार) दुपारी १२ पर्यंत सर्वांचे रिप्लाय येतील असं समजतो.

त्यानंतर मी मुद्द्यांचं एकत्रीकरण करुन रामदासकाकांसोबत चर्चा करेन.