साहित्यः
पनीर - १/२ वाटी
खवा - १/२ वाटी
मिक्स ड्रायफ्रुट्स (काजु, बदाम, पिस्ता, मणुका) - २ चमचे
काळि मिरी पावडर - २ चमचे
कॉर्नफ्लॉवर - १ चमचा
२ कांदे
काळि मिरी - २-३
लवंगा - १-२
दालचिनी - १ इंच तुकडा
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
काजु - १/२ वाटी (१ तास भिजवुन त्याची पेस्ट करुन घ्यावी)
क्रिम - २ चमचे
हिरवी मिरची - १
गरम मसाला पावडर - १ चमचा
तुप - १/२ चमचा
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
कृती:
१. एका पॅन मधे १/२ चमचा तुप गरम करावे. त्यात १ चमचा मिक्स ड्रायफ्रुट्स, १/२ चमचा काळि मिरी पवडर व एकदम थोडे मिठ टाकुन १ मिनिट परतावे. ते परतल्यावर बाजुला काढुन ठेवावे. कोफ्त्यांमधे भरण्या साठी सारण तयार आहे.
२. २ कांदे पाण्यामधे १० मिनिटे शिजवुन घ्यावेत. हे शिजवताना त्यात खडा गरम मसाला टाकावा.
३. कांदे शिजल्यावर त्यातील खडा गरम मसाला काढुन टाकावा व नंतर त्यात १ हिरवी मिरची टाकुन त्याची पेस्ट करुन घ्यावी.
४. कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटलीमधे पनीर, खवा, कॉर्नफ्लॉवर, काळि मिरी पावडर व मिठ एकत्र मळुन घ्यावे. त्याचे गोळे बनवल्यावर त्याचे smooth surface झाले पाहिजे.
५. त्या मिश्रणातील एक गोळा घ्यावा. त्या मधे आपण आधी तयार केलेले सारण भरावे.

६. हा तयार केलेला गोळा कॉर्नफ्लॉवर मधे घोळुन बाजुला ठेवावा. अशा प्रकारे सर्व गोळे करुन घ्यावेत.
७. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तेल थोडे तापल्यावर त्यात हे गोळे सोडावेत.
८. कोफ्ते हे एकदम मंद आचेवर व हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. कोफ्ते तयार आहेत.

९. ग्रेव्ही करण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात वरील कांदा व मिरची ह्याची केलेली पेस्ट टाकुन १-२ मिनिट परतावे.
१०. २ मिनिटांनी त्यात आले-लसुण पेस्ट टाकावी. ह्यास बाजुने तेल सुटायला लागल्यावर त्यात काजुची केलेली पेस्ट टाकुन परतावे.
११. काजुची पेस्ट करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रेव्ही सतत हलवत रहावी. बाजुने तेल सुटायला लागल्यावर त्यात पाणी व व टाकुन १-२ मिनिटे मंद आचेवर शिजवावे. त्यावर वरतुन २ चमचे क्रिम, चवीनुसार मिठ व गरम मसाला टाकुन मिक्स करावे. गॅस बंद करावा.
१२. मलई कोफ्ता serve करताना बाऊल मधे कोफ्ते ठेवावेत व त्यावर वरतुन हि ग्रेव्ही सोडावी. डाळिंबाचे दाणे, ड्रायफ्रुट्स व कोथिंबीरने सजवावे.
