
साहित्य-
साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किवा १.५ वाटी तयार टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,१ चहाचा चमचा कसूरी मेथी,
६-७ काजूबिया,साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,१ मोठा चमचा हेवी क्रिम,२ मोठे चमचे तेल,
मीठ चवीनुसार, १ चहाचा चमचा साखर
कृती-
बटन मशरुम्स अर्धे करुन घ्या.
टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरुन घ्या.
१ कांदा उभा जरा जाडसर चिरा.
सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या.
पळीभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता. ह्या सर्व मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करा.सिल्किश टेक्श्चर येईल.कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात उभा चिरलेला कांदा घाला व परता. मघाचची कांदा टोमॅटो इ.ची पेस्ट घाला.थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्या म्हणजे चांगली ग्रेव्ही होईल. त्याला एक उकळी आणा. आता चिरलेले मशरुम्स घाला व शिजू द्या.खूप शिजवू नका, मशरुम्स मेण होता कामा नये.हेवी क्रिम घाला.मीठ व साखर घाला.
कोथिंबिरीने सजवा.
शाही मशरुम मसाला तयार आहे.
नान/पराठा/रोटी बरोबर सर्व्ह करा.
