दिवाळी अंकाची बांधणी..

संपादकमित्रहो...

दिवाळी अंकासाठी ज्यांना लिहीतं करायचं आहे त्यांची यादी बनवण्यासाठी हा धागा चावडीवर काढतो आहे. या धाग्यावर आपापल्या मते चांगल्या लेखकांची यादी द्यावी. नेहमी न लिहीणार्‍या पण जुन्या चांगल्या लेखकांना या निमित्ताने समोर आणणं असाही एक अजेंडा ठेवता येईल.

संगीत
पाककृती (स्टेप बाय स्टेप फोटो. दिवाळीशी सुसंगत असल्यास उत्तम)
भटकंती (प्रवासवर्णन विथ फोटो)
ललित
कथा
कलादालन (मुख्यतः छायाचित्रं)

या विभागांमधे प्रत्येकी किमान पाच आणि जास्तीत जास्त दहा एंट्रीज असाव्यात (एकूण अंकात किमान ३० लेख / कृती आणि कमाल ६० लेख / कृती) या हेतूने त्या त्या क्षेत्रातल्या जाणकार लेखकांना आमंत्रित करणारे व्यनी लिहीता येतील.

अनेक लेखकांची नावं पुढे आली तर जास्त संपादकांच्या मताने रेकमेंड झालेल्या लेखकांना प्राधान्य द्यावं.

५०% खास निमंत्रित लेखन आणि ५०% सर्व सभासदांना आवाहन करुन आलेल्या उत्स्फूर्त लेखनातल्या निवडक लेखनाचा समावेश करावा अशी साधारण ढोबळशी आउटलाईन मनात आहे.

सर्व सदस्यांना आवाहन करुन मागवलेले लेखन रिजेक्ट होऊ शकण्याच्या शक्यतेविषयी स्पष्ट कल्पना देणारा मजकूर आवाहनात पब्लिश करावा लागेल. हे साहित्य पुढे नेहमीचा धागा म्हणून काढण्यास सदस्यांना सोयीचं जाईल..

बाकी सूचनांचं स्वागत..

अंक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण व्हायचा तर आता सर्व हालचाली तातडीने व्हायला हव्यात. लेखकांना किमान दोन आठवडे वेळ दिला पाहिजे.