नायगरा आणि शिकागो...
नमस्कार मंडळी,
शुद्धलेखन इतके शुद्ध नाही आहे म्हणून क्षमा असावी...
पहिल्यांदाच अमेरिकेला येण्याचा योग आला आहे... आणि इथल्या जीवन शैली नुसार एका लांब सुट्टी च्या वेळी नायगारा आणि शिकागो जाण्याचा योग आला त्याचेच वर्णन देत आहे...
सर्वात आधी नायगारा ला गेलो... खरच निसर्गचा चमत्कार बघितल्याचा अनुभव आला...(असा बरेचसे ठिकाण बघितल्यावर येतो)...आम्ही अमेरिकेच्या दिशेनेच बघितला बारा का फक्त..(बरेच लोक लगेच विचारतात कॅनडा च्या दिशेने बघितला कि अमेरिकेच्या?? आम्ही तर दोन्ही कडून बघितले आहे बाबा... )
मैड ऑफ द मिस्ट... वरील बाजूने...
मैड ऑफ द मिस्ट... जहाजातून... खरच ह अप्रतिम अनूभव होता.. पहिली वेळ होति ना म्हनून...
अजून एक..दोन
रेनबो पूल... हाच तो जो अमेरिका आणि कॅनडा ला जोडतो...
दुसऱ्या दिवशी शिकागो ला आलो परतीच्या मार्गावरच आहे म्हणून...
२-पानोरामिक...
खालील सर्व चित्र आय फोन ४स वापरून काढले आहेत..
प्रसिद्ध आणि उंच सेअर्स टोवर... १४५० ft... बांधकाम विश्वातील एक चमत्कार
मनोऱ्यावरून शिकागो शहराचा नजारा....
वरतून खाली... चक्कर आली नाही कुणाला नशीब... नाहीतर तिकडे बायकांचा त्यांच्या शैलीत आरडा ओरडा चालूच होता...
तसा मी पदवीधर बरका, नाहीतर तुम्हाला वाटायचा आमची मंडळी पण वरील बायकांमध्ये समाविष्ट होती... :P
हे एक नवीनच पण छान होता... याचे रंग हळू हळू बदल्कायाचा... रंग बदलणाऱ्या कॅप्सूल म्हटला पाहिजे यांना ... पण शहराच्या शोभेला अजून शोभा दिली याने तिथल्या रस्त्यावर...
हा गोळा म्हणजे गम्मतच आहे... सर्वांना वेड लावतो...
मला भटकंती करायला जाम आवडत आणि बराच भटकत पण असतो पण तसा हा पहिलाच धागा टाकत आहे मिपा वर....
प्रतिसाद आणि सल्ला जरूर कळवा...
आभारी आहोत...