
साहित्यः
फरसबी १० नग
गाजर २ नग
कॉली फ्लॉवर १ मोठी वाटी भरून.
मटार १/२ मोठी वाटी.
भोपळी मिरची २ नग
कांदा २ नग मध्यम
अख्खे धणे १ मोठा चमचा (टेबल स्पून)
जीरं १ लहान चमचा (टि स्पून)
काश्मिरी मिरच्या ३ नग
लसूण ५-६ पाकळ्या
आलं १ इंच
हिरवी मिरची १ नग
हळद १/२ लहान चमचा
धणे पावडर १ मोठा चमचा
टोमॅटो २ मध्यम
तेल अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
काजूपाकळी ८-१० (वैकल्पिक)
कोथिंबीर आणि आलं सजावटीसाठी.
तयारी:
फरसबी, गाजर, भोपळी मिरची, टोमॅटो ह्या भाज्यांचे अर्ध्या इंचाचे तुकडे करून घ्या.
कांदा लांब आकारात चिरुन घ्या.
कॉलीफ्लॉवरचे छोट्या आकाराचे तुरे काढून घ्या.
आख्खे धणे, जीरे आणि काश्मिरी मिरच्यांचे तुकडे कोरडेच परतून त्याची पावडर करून घ्या.
आलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरवर वाटून घ्या.
कोथिंबीर चिरून घ्या. आल्याचे, काड्यापेटीच्या काडीच्या आकारात, तुकडे करून घ्या.
कृती:
एका कढईत तेल तापवा. त्यात काजूपा़कळी फिकट रंगावर परतून घ्या. त्यावर कांदा टाकून परता. कांदा शिजून मऊ होईपर्यंत परता.
धणे, जीरे, काश्मिरी मिरच्यांची वाटलेली पावडर थोड्या पाण्यात कालवून कढईत टाका. पाणी आटेपर्यंत मध्यम आंचेवर परता.
पाणी आटल्यावर आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट त्यात मिसळा. पुन्हा परतत राहा.
भोपळी मिरच्या आणि टोमॅटो वगळून बाकी भाज्या कढईत टाकून परता. थोडे पाणी घालून, नीट मिसळून, झाकण ठेऊन मंद आंचेवर भाज्या शिजवून घ्या.
भाज्या अर्धवट शिजल्यावर त्यात भोपळी मिरच्या आणि टोमॅटो मिसळा. हळद, धणे पावडर आणि मीठ मिसळा. गरज असल्यास थोडे पाणी घालून (अंतीम पातळीला भाजीत जास्त पाणी असता कामा नये हे लक्षात असू द्यावे) झाकण ठेवून भाज्या पूर्ण शिजवा.
भाज्या शिजल्यावर बाऊलमध्ये काढून कोथिंबीर आणि आल्याच्या काड्यांनी सजवा.
शुभेच्छा....!