ऐका हो ऐका!

नीलकांत/ प्रशांत,
कानसेन स्पर्धेच्या स्वयंसेवकांना स्पर्धेची जाहिरात द्यायची आहे. ती घोषणा या प्रकारात देता येईल का? आधी वाटले त्यापेक्षा जाहिरात फारच मोठी झालीये. तीचा मसूदा येथे देते. आपणा दोघांपैकी कोणी मिपावर आल्यास ती प्रकाशित करावी ही विनंती.

सर्व मिपाप्रेमींनो, तयार रहा एका सुरेल स्पर्धेसाठी!

मिपाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांची आवडती मिपा कानसेन स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी खास निवडलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सदाबहार गाण्यांचा आनंद तुम्ही घरातल्या ज्येष्ठांसोबत एकत्र लुटू शकाल.
दिनांक २६ सप्टेंबर व २७ सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वा. पासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार्‍या या स्पर्धेचे विजेते तुम्ही होऊ शकता.

कानसेन स्पर्धेत भाग घेऊन तुम्ही सलग सहा तास सुरु राहणार्‍या पंचखंडातील पहिल्या-वहिल्या ऑनलाईन 'गाणी ओळखा' कार्यक्रमाचे स्पर्धक म्हणून (आणि खरंच हुषार असाल तर विजेते** म्हणून ) ओळखले जाल. तेंव्हा, तय्यार व्हा जुन्या सुरावटी ओळखायला! संपूर्ण स्पर्धा संपल्यावर सर्वाधिक गाणी आणि गायक/ गायिका ओळखणार्‍या स्पर्धकाला/ स्पर्धकांना विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.

(ज्या नव्या सभासदांना या आधीच्या स्पर्धांची माहिती हवी असेल त्यांनी या दुव्यावर* भेट द्यावी.)
1. http://www.misalpav.com/node/13040
2. http://www.misalpav.com/node/13072
3. http://www.misalpav.com/node/13075
4. http://www.misalpav.com/node/13089
5. http://www.misalpav.com/node/13097
6. http://www.misalpav.com/node/13120
7. http://www.misalpav.com/node/13124
8. http://www.misalpav.com/node/13131