काऊंटडाऊन...

नमस्कार,

मिसळपावच्या आजच्या प्रगतीबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

आज आपण मिपा ७ वर यशस्वीरित्या नेऊ शकतोय. खरडवहीमध्ये काही अडचणी आहेत. त्या दूर होतील. तसेच गमभन मॉड्युलसुध्दा चाचणी पुर्ण करतेय असं दिसते. आपण आता त्याची चाचणी घेणार आहोतच.

बा़की सगळे साहित्य आणि प्रतिक्रिया सुरक्षीत अपग्रेड होत आहेत. बा़की महत्वाचे तेवढे यशस्वीरित्या करता येत आहे.

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे अन्य कामे ज्यात मला सर्व संपादक, सल्लागार आणि ओळखीच्या सदस्यांची मदत पाहिजे आहे.

१) कॅटेगरी (नेमका मराठी शब्द ? ) - या आधी माझे मत असे होते की सदस्यांना त्यांच्या लेखनाला कॅटेगरीज जोडता यायला हव्यात मात्र संपादकांनी नकार दिल्याने मा़झा विचार मागे घेतो आणि कॅटेगरीज वाढवायचा विचार करतो आहे.
त्यामुळे एक धागा काढून शक्य तेवढ्या कॅटेगरीज गोळा करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. हा धागा जाहीर काढला तरी चालेल किंवा चावडीतून किंवा व्यनितून हे करता येईल.
२) धोरणे आणि अटी व शर्ती - याविषयी सर्वच संपादकांनी सल्लागारांनी सहभाग द्यावा. आपण मिळून ही धोरणे पुन्हा बघुया आणि याआधी अनेक वेळा झालेल्या चर्चांच्या आधारे एक नवीन ड्राफ्ट बनवूया. मी हे नवीन धोरणे प्रत्येक सदस्याने वाचावेत याची काळजी घेईल.
३) मराठीकरण - मराठीकरण करण्यासाठी एक धागा काढतोय. शक्यतो एक लाईव्ह सिस्टीम देतो म्हणजे आहोत तेथून सहभागी होता येईल.

नव्या रचनेत आपण खेळासाठी नियमीत साहित्य प्रकार उपलब्ध करून देतोय. तसेच दखल किंवा ओळख सुध्दा सुरू करतोय. समाजात काही सेवाभावी अथवा समाजोपयोगी प्रकल्प चालले असतील तर मिपाच्या मंचावरून आपण त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी असा यामागे विचार आहे.

फेसबुक - नवीन रचनेत फेसबुक लाईक नावाचे बटन प्रत्येक लेखाखाली असेल. त्यामुळे सदस्यं अथवा वाचकसुध्दा त्यांना आवडलेले लेख फेसबुकवर शेअर करू शकतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे आपले प्रयत्न यामुळे अधीक सफल होतील अशी आशा आहे.

उपद्रवी सदस्यं.- आपण काळी यादी सुरू केलेली आहेच. सोबतच नवीन रचनेत सरळ बॅन करण्यापेक्षा मिझरी नावाच्या रचनेत टाकता येईल. या रचनेमुळे त्या सदस्याला स्वत:च काही अडचणी येतील आणि त्याला उपद्रव करण्याचा उत्साह कमी होईल. शेवटी बॅन करणे आहेच. ( या बद्दल बिपीनदा आधी बोलला आहेच.)

शोध - मिपाचा शोध चांगला करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले आहेत त्यामुळे मिपाचा शोध नवीन रचनेत चांगला असेल.

आता राहिलेल्या गोष्टी -

१) थीम - आपला थीम डिझायनर इनोबा जिप्सीसारखा पुन्हा मुळशी भागात गेलेला दिसतोय. त्यामुळे या फ्रंटवर आपण कमी पडतोय. नवीन थीम लावण्याचा विचार होता मात्र आता असं दिसतंय की नवा कोरा कॅनव्हस वापरावा लागणार आहे. अशी वेळ आली तर पांढर्‍या रंगाने रंगवलेला कागद ( म्हणजे नवा कागद :) ) वापरावा लागेल. माझी बाकी कामे लवकर झाली तर मी याकडे लक्ष देईल. तो पर्यंत रामभरोसे.

२) सर्व्हर लोड - मी गेल्या काही दिवसांपासून बघतोय की दुपारी किंवा संध्याकाळी सर्व्हरवरचा ताण वाढतोय. कदाचीत सर्चचे इन्डेक्स रिबिल्ट केल्याने लोड असेल असं वाटतंय. याबाबत सुध्दा बघावे लागेल. कारण सर्व्हर पुरेश्या क्षमतेचा आहे. असं माझं मत आहे.

३) इनलाईन इमेज - साहित्यात जोडल्या जाणारे फोटो लेखनात उजवीकडे किंवा डावीकडे जोडले जावे हा प्रयत्न आहे. हे होऊन जाईल.

४) संपादक - काही नवीन संपादक घ्यावेत असा विचार आहे.

मी काही विसरतोय का?

- नीलकांत