नवी रचना

नमस्कार,

येत्या गणेश चतुर्थीला मिपाला पाच वर्षे पुर्ण होतील. त्या निमीत्ताने आपण मिसळपाव वर काही बदल करतोय. मिपाचं उध्वश्रेणीकरण करतोय. मिपाच्या साहित्याची रचना बदलतोय. काही नवीन पाने जोडतोय. याच सोबत संपादक मंडळात काही संपादक जोडावेत अशी अपेक्षा आहे. किमाण चार तरी नवीन लोक पाहिजे आहेत. यापुर्वी सुध्दा तुम्हा सर्वांना मी तुमच्या विचाराने कोण कोण लोक घ्यावेत या बद्दल विचारकरून मला सांगा असं बोललो होतो. त्यानुसार आलेल्या लोकांपैकी काही निवडले आहेत.

या सोबतच तुमच्या पैकी कुणी संपादकीय कामातून बाजूला होऊ इच्छीत असेल तर त्यासाठीही ही वेळ योग्य आहे. कुणी जावं असं मला मुळीच वाटत नाही. मात्र कार्यबाहुल्य, कंटाळा किंवा अन्य काही कारणाने आपण संपादकीय जवाबदारी पार पाडण्यास हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही असे काहिंचे मत असेल तर ही वेळ योग्य आहे.

यापुढे संपादक, सल्लागार आणि काही सदस्यांना आपण पहिले पान सजविण्याचे अधिकार देणार आहोत. यात पहिल्या पानावरील वेळोवेळी बदलणारे बॅनर, तसेच पहिल्या पानावरील जनातलं मनातलं आणि अन्य लेखांचे जे ब्लॉक आहेत ते सुध्दा केवळ चांगले तेच लेखन तेथे जावे अशी रचना करूया.

या सोबतच काही पाने जोडतोय. यात आम्ही कोण? ( यापेक्षा चांगले शि़र्षक देता येईल का? ) हे पान लावून त्यामध्ये मिसळपावबद्दल माहिती देता येईल.

सोबतच दखल नावाचे पान तयार करून मिसळपावच्या लोकांपर्यंतच्या प्रसाराचा वापर समाजातील चांगल्या उपक्रमांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करूया. जसे ई साहित्य आणि बोलकी पुस्तके सारखे प्रकल्प आहेत किंवा अन्य सुध्दा काही देता येईल.

नवीन रचनेत शोध चांगला करण्यावर भर आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून त्यावरच खटपट चालू आहे. सोबतच गमभनचे ७ साठीचे मॉड्युल बनवने सुरू आहे. सदस्यांना त्यांचे पान देऊया ज्यात त्यांना हवे तसे ब्लॉक्स त्यांना जोडता येतील. शक्य असल्यास त्यांना त्यांच्या सारणी बनवता येतील असा विचार आहे. अर्थात सारणी (व्हिव) बनवताना डेटाबेसवर ताण आल्यास ही कल्पना सोडून देऊ.
नवीन रचनेत नव्याने मराठीकरण करायचे आहे. यात कोण सहभाग देणार? यात करायचे असे आहे की इंग्रजी शब्दाला चपखल मराठी प्रतिशब्द द्यायचा आहे. यात तांत्रीक काहीच नाही. त्यामुळे सदस्यांची मदत सुध्दा घेऊ शकू. एक वर्ड फाईल देईल त्यात इंग्रजी शब्दासमोर चपखल मराठी शब्द जोडावा. यावर हवे असल्यास चर्चा करता येईल. जाहीर सुध्दा.

बाकी मागे दिलेले अनेक बदल यादी बनवून सोबत आहेत. याशिवाय काही महत्वाचे असेल तर कळवा. येत्या काही दिवसांत झालेले बदल वापरून त्याची चाचणी करण्यासाठी सर्वांना बोलवतो.