पायेला (स्पॅनिश राइस)

साहित्यः

अर्बोरीयो राइस - १ कप
चिकन - २५० ग्रॅम
प्रॉन्स - १०-१२
शिंपले - १०-१२
टोमॅटो प्युरी - ४ चमचे
कांदा - १ बारीक चिरुन
लसुण - ३-४ पाकळ्या बारीक चिरुन
चिकन स्टॉक - ३ कप
लिंबु - १
लाल मिरची पावडर - १ चमचा
स्मो़क्ड पाप्रिका - २ चमचे
केशर - १ चमचा
मिठ चवीनुसार
ऑलिव्ह ऑइल - ३-४ चमचे

भात शिजवण्यासाठी पसरट पॅन

कॄती :

१. पॅन मधे १ चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात चिकन ५-८ मिनिटे परतुन घ्यावे. ते बाजुला काढुन ठेवावे.
२. त्याच पॅन मधे १ चमचा तेल टाकुन, त्यात प्रॉन्स, शिंपले हे परतुन घ्यावे व बाजुला काढुन ठेवावे.
३. पॅन मधे उरलेले तेल गरम करावे. त्यात चिरलेला लसुण व कांदा परतुन घ्यावा. हे २-३ मिनिटे परतल्यावर त्यात टोमॅटो प्युरी, लाल मिरची पावडर, Smoked paprika, केशर व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करावे. तेल सुटे पर्यंत परतुन घ्यावे.
४. त्यात तांदुळ टाकुन परतावे. त्या मधे ३ कप चिकन स्टॉक टाकावा. भात झाकुन १०-१५ मिनिटे मध्यम आचेवर शिजु द्यावा. स्टॉकचे प्रमाण कमी-जास्त करु शकतो. ह्या भाताला शिजवण्यासाठी साध्या भातापेक्षा जास्त पाणी लागते.
५. भात ८०% शिजल्यावर त्यात चिकन, प्रॉन्स, शिंपले, लिंबुचा रस व कोथिंबीरने सजवावे.
६. भात शिजल्यावर, पॅन टेबल वर ठेवुन गरम-गरम serve करावे.

टिपः

१. तुम्हाला आवडत असल्यास, भात शिजवताना त्यात थोडी white wine सुद्धा वापरु शकतात.
२. तुम्ही आवडीनुसार त्या मधे squid, crab meat वापरु शकता.

p1

p2