नमस्कार माननीय संपादक बंधू आणि भगिनी.
थत्तेंच्या धाग्यावर श्रामो आणि क्लिंटन यांच्या वादावादीवर नजर टाकली.
हो, नजरच टाकली. पूर्ण वाचत बसले तर म्हातारपण येईल. :)
श्रामोंना आजकाल काहीतरी झालय. बरं, ते असू द्या, क्लिंटन यांना फक्त मुद्द्याला धरून बोलायचे होते पण श्रामोंनी शब्दाशब्दाचा कीस काढला आहे. यामुळे प्रतिसादकर्ता नाउमेद होण्याची शक्यता असते. तेच इथे झाले. आता क्लिंटन उर्फ गिरीश खरे यांची समजूत घालणे आणि दुर्लक्ष करण्यास पटवणे हे मोठे काम आहे. त्यांना एक इमेल केली आहे त्यात "मला जरा वेळ द्या, बघते काय होऊ शकतय ते." असे लिहिले आहे. याबद्दलची चर्चा आणि येत्या ३० दिवसातील संपादन, वाद, भांडणे, अपमान, आणखी जे काय असेल ते येथे नोंदवावे ही हात जोडून विनंती.:)
आपली नंब्र,
रेवती