सध्या मला माझा कॅमेरा घेउन वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे...
जालावर फोटोग्राफी संबंधी विविध लेख वाचायचे आणि त्याचे जमतील तसे प्रयोग करुन पाहावयाचे...
सध्या जालावर एचडीआर (High dynamic range) फोटोंची धूम चालु आहे... मी सुद्धा यात सामिल व्हायचे ठरवले,मग काय प्रयोग सुरु.
यातला पहिला प्रयोग म्हणजे घोस्ट इफेक्ट ! एचडीआर फोटोग्राफी मधे नको असलेला एक अडथळा...
मी याच अडथळ्याचा वापर करायचे ठरवले.माझा एचडीआर फोटोग्राफी एक प्रयोग थोडासा सफल झाला आहे,पण अजुन हवी तशी लोकेशन किंवा सबजेक्ट सापडला नाही...पुढच्या भागात बहुधा मी एचडीआर फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन....
तो पर्यंत तुम्ही घोस्ट इफेक्ट पहा. :)







कॅमेरा- निकॉन डी-५१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....