अनामिक भटकंती ११: तुंग

१० जून पासुन प्रत्येक आठवड्याला एक भटकंती असे गणित यावेळेस चुकते की काय वाटत असतानाच रात्री तुंग किंवा विसापुर या जवळच्या किल्ल्यांना भेट देण्याचा बेत ठरला. तरीही मुंबई वरुन पुण्याला घरी जाण्यास उशिर झाला आणि उद्याचा प्लॅन नक्की काय हे न ठरवताच उद्या उगवला सुद्धा.

सकाळी मित्राला फोन करुन निवांत जाऊ असे ठरवून तो आल्यावरच कुठल्या किल्ल्याला जायचे ते ठरवु सांगितले.
मागील आठवड्यात ही, विसापुर चा प्लॅन असताना, ऐन टाईमला पावसात गच्च भिजुन बेडसे ला गेलो .यावेळेस ही विसापुर नको.. गर्दी असते. या कारणाने तुंग रस्त्यातच फायनल झाला, आणि आम्ही दोघे सोमाटणे फाटा- पवनानगर - तिकोना-जवन आणि नंतर समोर दिसणार्या किल्ल्याला पण वळसा घालुन जावे लागल्याने सुमारे २५ कीमी अंतर असलेल्या नितांत सुदर निसर्गाने उधळन केलेल्या रस्त्याने तुंग ला पोहचलो.

पवन मावळ मधील घाटरक्षक असलेला तुंग किल्ला पुर्वी बोरघाटमार्गे चालणार्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी उपयोगात यायचा.
लोहगड विसापुर एका बाजुला, तिकोना आणि नंतर तुंग हे पवन मावळचे चार शिलेदार.
लोहगड- विसापुर आणि तिकोना या किल्ल्यांवर आता गर्दी खुप असते, त्यामुळे निखळ आनंद दायी सोपा ट्रेक म्हणजे तुंग

गोमुखी मुख्य द्वारा मधुन वरती गेल्यावर, सर्वत्र सतेज हिरवळ पसरलेली होती, हवेतील अल्हाद दायकता, प्रदुषणाचे नामोनिशान नाहि, आणि आमच्या नशिबाने तेथे कोणीच नाही ( फक्त २ छोटे गृप वरती भेटले.. बस्स) अश्या सुंदर वातावरणात मन एकदम रमुन गेले, गार वार्यात तेथेच थांबावे असे वाटत होते.

गडाचे सर्वोच्च टोक

भातशेती.

बर्याच भेटणार्या लोकांशी बोललो, शेतात भात तर लावला हाये पण पावसानं लय इक्रित केलय यावेळेस, मावळात पण पाउस नाय म्हण्जी कमाल झालीया, आता येत्या आठवड्यात पावसानं दगा दिला तर सगद संपल, पोटाला चिमटा काढुन जगाव लागल.
असे सगळ्या गोष्टी ऐकत, आणि पावसाला साकडे घालत आम्ही निघालो होतो.

तळे

लोहगड - विसापुर

परतताना..
खरे तर गडावरील अल्हादायक वातावरण, प्रदुषणाचे नामोनिषाण नाही.. प्रसन्नता खुप. पुन्हा माघारी फिरुच नये असे वाटत होते. परंतु तसे करुन चालत असते तर माणुस सर्वात सुखी झाला असता.
तरीही परतताना लागलेली भाताची खाचरे, हिरवा निसर्ग, पांढरे शुभ्र झरे आणि काळे ढग मन मोहवुन टाकत होते.

घोड्यांवरी स्वार झाल्याप्रमाणे येणार्‍या पाऊसाच्या धारा मध्येच चिंब करत होत्या.

--------------------------------------------------------------------------------
अनामिक भटकंती ८-९-१०: रोहिडा-लोहगड-बेडसे.
अनामिक भटकंती ७: राजगड...स्वराज्याचा शिल्पकार : http://www.misalpav.com/node/20849
अनामिक भटकंती ६ - कार्ला लेणी.
अनामिक भटकंती ५ - किल्ले पुरंदर : http://www.misalpav.com/node/20592
अनामिक भटकंती ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323

--------------------------------------------------------------------------------