छत्री

सध्या थोडास पाऊस पडतोय... आणि अनुभवाला देखील मिळतोय.
आता...जेव्हा पावसात भिजत नसतो...तेव्हा इतरांना भिजताना पाहतो.
जितकी माणसं तितक्या छत्र्या आणि जितक्या छत्र्या तिततकीच छत्र्यां मधली विविधता...
मग ती विविधता टिपायचा विचार केला...तेव्हा छत्री आणि छत्र्या वापरणार्‍यांच्या विविध मुद्रा टिपायचे ठरवले...
छत्र्या... सगळ्यांसाठी छत्र्या ! वय/स्त्री/पुरुष्/वॄद्ध्, अगदी लहान मुलांच्या आवडी-निवडी नुसार छत्र्या मला पहायला मिळाल्या ! :)
पुर्वी स्त्रींयांच्यां छत्र्या रंगीबेरंगी आणि पुरुषांच्या मात्र काळ्या असा भेदभाव दिसुन येत असे,आता मात्र जमाना बदलला आहे...स्त्रीया काळ्या छत्र्या आणि पुरुष रंगीबेरंगी छत्र्या वापरताना सहज दिसतात.
तुम्हाला जर या छत्र्या आवडल्या तर नक्की सांगा... आणि मग याचा दुसरा भाग टाकावा ? की नाही ? या बद्धल तुम्हीच सांगा.

कॅमेरा:- निकॉन डी-५१००
* फोटो फक्त कंप्रेस केले आहेत.सॉफ्टवेअर वापरुन कुठलाही बदल केलेला नाही.

(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....