श्री नीलकांतच्या चावडीतल्या एका धाग्यावरचा नवीन रचना असा चावडीतला प्रतिसाद पाहिला. प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काही कॅटीगिर्या वाढविण्याचा विचार दिसत आहे. विचारपूस नावाचा असा एकोळी-दोनोळीसाठी स्वतंत्र असे चौकशीचे ठिकाण कल्पनेत दिसत आहे. कॅटीगिरी जोडायचे स्वातंत्र्य लेखकाला द्यावे, असाही सूर प्रतिसादात दिसत आहे. बाकी, मिपाने काही बदल करायचे ठरविलेले दिसत आहे मिपाचे तंत्रज्ञ योग्य ते बदल करतीलच.
आता वरील विषयावर आम्हा संपादकांना काय वाटतं ते लिहावं म्हणून चावडीवरचा प्रपंच.
माझं कॅटीगिरीच्या बाबतीत मत असं, की काही कॅटिगिर्या वाढविल्या पाहिजेत. कॅटीगिर्याचं स्वातंत्र्य दिल्यावर कै च्या कै. कॅटिगिर्या लेखक मंडळी टाकतील. दुसरं असं की नवीन धागा लिहितांना किमान शब्दांची भर असली तर लेखन प्रकाशित व्हावे. मिपाच्या धोरणात काही भर घालणे आवश्यक आहे. खरड फळ्यावर ती बटनं (बोल्ड अक्षर, रंगकाम) असली पाहिजेत. सर्च इंजिन अधिक सोपं झालं पाहिजे. मिसळपाववर शोधायचं तर मिपाची पानं सापडली पाहिजे. आणि महाजालात शोधाशोध करायची तर तिकडेही जाता आलं पाहिजे. [अजून आठवेल तसं प्रतिसादात खरडेनच]
बाकी,संपादक आणि सल्लागारांना काय वाटतं ?