(रिंगिंग द बेल) आणि धोरण

नमस्कार मंडळी,

ऋषिकेशने तो धागा का चालू केला आदी अनेक प्रश्न तुर्तास बाजूस ठेवूयात. मात्र उपक्रमावर चालू असलेली चर्चा वाचल्यास, फॅक्ट ऑफ दी मॅटर तशीच राहते: निखिल जोशीने स्क्रिप्ट तयार केली होती, प्रियालीस ती माहीत होती आणि त्याचा दोघांनी वापर देखील करून पाहीला होता. जर टेस्टींगच करायचे असले तर ते डमी वेबसाईट वर करता येते असे मला वाटते. निखिलने चारपाच तासात दुसर्‍याचे व्यनि वाचता येतील अशी स्क्रिप्ट तयार करता येईल असे वर म्हणले आहे... नावे जाहीर आहेत म्हणूनच येथे त्यानिशी संदर्भ देत आहे, पण परत त्यांनी काय केले हा मुद्दा दूर ठेवूयात.

कोणाला किडे करायचे असले तर त्याला कोणी थांबवू शकणार नाही, हे वास्तव आहे. पण माझ्या दृष्टीने तसे जर येथे कोणी केले तर त्याला रीअ‍ॅक्शन म्हणून काय जाहीर धोरण असावे हे पाहीले पाहीजे. माझ्या दृष्टीने असे प्रकार करणार्‍या व्यक्तीचे सर्वच आयडीज बंद होतील आणि आयपी ब्लॉक केला जाईल आणि ते घोषणेमधून सांगण्यात येईल असे आपण जाहीर केले पाहीजे. तसेच कुठलेही स्क्रिप्ट/मोड्यूल हे मिपावर टेस्ट न करता डमी साईट वर टेस्ट केले जाते हे देखील स्पष्ट केले पाहीजे असे वाटते.