बिकाच्या धाग्याने शतक गाठलं. आता प्रतिसाद दुसर्या पानांवर जातायत आणि महिनाही बदलला म्ह्णुन नवा धागा सुरु करत आहे.
बुवांचा जन्म (http://www.misalpav.com/node/21814) हा धागा अजुन वाचला नाही. पण काही प्रतिसाद संपादित करत असताना कळले की हे इप्रत्रातुन आलेलं लेखन आहे. (लेखक म्हणे मिपाचे वाचक आहेत.) असं लेखन मिपावर ठेवाव का? (उत्तर होकारार्थी असेल तर परत 'का?')
तिथला भीमाईचा पिपळ्या यांचा प्रतिसाद अत्यंत गलिच्छ होता. तो कुणी तरी लगेच उडवला. पण काही लोकांनी वाचलाच. त्यांना समज देणे गरजेच आहे असे वाटते. तर तशी समज दिली गेली आहे का? (नसल्यास मी व्यनी करेन.)