पुन्हा एकदा गॅस बर्नर...

हल्ली शहरात ग्राहक पेठ भरतात्,खरेदीच्या विविध वस्तु यात विक्रीस ठेवलेल्या असतात. अगदी लोणच्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंतं बरेच काही पहावयास मिळते.
अशाच एका बाजार पेठेत माझे तिर्थरुप गेले आणि एक वस्तु त्यांना तिथे दिसली व उपयोगी वाटुन ती त्यांनी खरेदी केली.
ती वस्तु म्हणजे एक जाळी असुन ती गॅस बर्नरवर ठेवतात, त्यावर वांगे,पापड इं. भाजणे सोपे जाते आणि बर्नरही खराब होत नाही.
हाच बर्नर जाळी ठेवल्यावर कसा दिसतो, ते तुम्हाला दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. :)

१) पहिला फोटु बर्नरचा,त्यावर जाळी ठेवलेली आहे.पण माझे लक्ष फक्त ज्योतींकडे आहे.

२)कॅमेर्‍याच्या सेटींगमधे बदल केला आणि आता फक्त जाळीवर लक्ष केंद्रीत केले,जाळी लगेच तापायला सुरु झाली आहे.

३)तारा अशा मस्त दिसतात...

४)जरा वेगळ्या अँगल मधुन पाहताना.

५)बर्नर आणि जाळी यांच्या मधला भाग कसा दिसतो ते पाहत असताना हा टिपला.

६)आता लवकरच या तापुन लालबुंद होतील.

७)लालेलाल !

७) शेवटचा फोटु त्या तारांचा...

आधीचा भागः--- गॅस बर्नर...
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....

कॅमेरा:--- निकॉन डी ५१००
*टिप :---- सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.