फुलांच्या रांगोळ्या-सप्तपदी विशेष

यापूर्वी इथे प्रदर्शित केलेल्या रांगोळ्या :-)

http://www.misalpav.com/node/19262

http://www.misalpav.com/node/20308

या वेळच्या रांगोळ्यांमधे गेल्या दोन महिन्याच्या सिझन मधे काढलेल्या सर्व रांगोळ्या आहेतच. परंतू त्यातल्या स्पेशल आणी वेगळ्या आहेत त्या अधी डकवल्या आहेत... सप्तपदीच्या रांगोळ्या आणी काही स्पेशल ,वेगळ्या अगदी भरपूर वेळ देऊन काढलेल्या रांगोळ्यापण या वेळच्या भागात आहेत. आणी तश्याही सप्तपदीच्या दोनच आहेत...कारण दरवेळी त्यासाठी लागणारा वेळ,तसं काम करवून घेण्यास उत्सुक असलेला ''यजमान'' ...हे सगळच गणित जमतं असं नाही...कारण १ सप्तपदीची रांगोळी(गालिचा) काढायचा म्हटला तर...अदल्या दिवशी मार्केटयार्डातून फुलं घरी आणणे- १तास+ वेगवेगळ्या फुलांचं कंटींग-४ ते५ तास+ दुसर्‍या दिवशी(लग्न दिवशी) कार्यालयात मुहुर्त कितिचा आहे हे पाहुन ,,,त्याप्रमाणे अगदी कधी कधी पहाटे ५ वाजल्यापासून...सप्तपदी काढायला लागणारा वेळ ३ ते ४ तास= सगळे मिळून सात ते नऊ तास इतका वेळ या एका सप्तपदीला मोडतो...(अगदी पावला गणिक १तास असं म्हणायलाही हरकत नाही :-) ) त्यामुळे सप्तपदीच्या रांगोळ्या दोनच आहेत.... बाकिच्या नेहमी प्रमाणे.. :-)

१)सप्तपदी...

शेवटचा हात मारताना...

अता चालवली पहा वधू....... ''ईषे एकपदी भव.....''

शेवटच्या सातव्या पदी... सखा सप्तपदी भव...।

२) घरी येणार्‍या नव दांपत्यासाठी पायघड्या...

३)घरी प्रवेश केल्यावर-नामलक्ष्मी पूजना साठी... स्पेशल रांगोळी

४)आता इथुन पुढे नेहमीच्याच पुजेच्या आहेत..पण तरिही स्पेशल आहेत.. :-)

आणी आता दी ऐंड विथ लव्ह स्मायली

यावेळेसचे सगळे फोटो--- सॅमसंग प्राइमो मोबॉइल कॅमेरा... :-)