यकुंचा "भंकस" हा लेख आणि प्रतिसाद मी नजरेखालून घालत होतो. इथल्या संपादक प्रभृतींनी तसेच इतर अनेकांनी त्याला यथायोग्य प्रतिसाद दिले आहेत. मात्र मला राजेश घासकडवींचे प्रतिसाद जरासे खटकले. हे व्यक्तीगत नाही हे आधीच सांगतो. पण एक धोरण म्हणून काय असावे याचा विचार होणे गरजेचे आहे असे या संबंधाने वाटले.
घासकडवींनी त्यात यकुंना सातत्याने (म्हणजे पहील्या प्रतिसादात आणि नंतर यकुंचे उत्तर आल्यावरही) क्लिनिकली डिप्रेशनचे पेशंट असल्याचे अनुमान (स्वतः त्या विषयातील तज्ञ अथवा डॉक्टर नसताना) काढलेले आहे. ते देखील जाहीर पणे यकुंना सांगत... नंतर लक्षात आले की आता "५० फक्त" पण यकुं शी हुज्जत घालत आहे की त्यांना आलेले डिप्रेशनच कसे आहे.
जर असे सतत कोणी कुणाला म्हणायला लागले अथवा एखाद्याच्या लेखनाचा अन्वयार्थ असा जाहीर काढू लागले तर ते योग्य ठरेल का? आज काय डिप्रेशन, उद्या अटेन्शन डेफिस्टी डीसऑर्डर, परवा स्क्रीझोफ्रेनीक.... आणि हे सगळे कशाच्या जोरावर, तर विकीवरील माहीतीच्या? आणि ते ही असे जाहीर?
मला स्वत:ला ते योग्य ठरणार नाही असे वाटते. त्या व्यतिरिक्त सध्याच्या जगात असले विषय हे अधिक सेन्सेटीव्ह ठरू शकतात आणि त्याचे गैरपरीणाम देखील होऊ शकतात. उद्या यकु त्यांच्या धाग्यातील चर्चेमुळे स्वतःस डिप्रेस्ड समजू लागले तर त्याला जबाबदार कोण ठरू शकतो?
एखाद्याच्या लेखनावर टिका करणे, टपलीत मारणे, अगदी कंपूगिरी करून नडणे देखील मी समजू शकतो. माझ्याविरोधात तसे झाले आहे आणि मला काही प्रश्न नाही. जाहीर संस्थळांवर असे होऊ शकते हे प्रत्येकानेच मान्य करायला हवे. पण व्यक्तीगत न होण्याचे नियम असतात आणि ते असल्या बाबतीतपण धोरण म्हणून पाळणे महत्वाचे आहे असे म्हणणे आहे इतकेच...
-------------