प्रभो

नमस्कार,

या संदर्भातला अगदी जाहीर धागा काढावासा वाटला नाही... प्रतिक भोसेकर उर्फ प्रभो, तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्यापैकी अनेकांच्या संपर्कात असेल असे वाटते म्हणून येथे लिहीत आहे.

२-४ दिवसांपुर्वी फेसबुकावरून त्याचा चित्राशी संपर्क झाला होता. त्यावेळेस त्याच्या आईस अपघात झाल्याचे कळले होते. दोन दिवसांपुर्वी मी चौकशी करायला फेसबुकवर व्यनि टाकला. तेंव्हा काल कळले की दुर्दैवाने त्याच्या आईला झालेल्या अपघातातून ती वाचली नाही... गेल्या वर्ष-दिडवर्षात त्याचे वडील गेले. आणि आई-बहीणीची काळजी घेण्यासाठी म्हणून त्याने अमेरीकेतला गाशा गुंडाळला आणि भारतात जायचे ठरवले.

त्याने कुठे जाहीर केल्याचे दिसले नाही म्हणून मी हे खाजगीतच सांगत आहे. तसेच त्याचा भारतातील फोन नंबर असला तर मला येथे कळवावा.