अनामिक भटकंती ७: राजगड...स्वराज्याचा शिल्पकार

अनामिक भटकंती ६ - कार्ला लेणी.
अनामिक भटकंती ५ - किल्ले पुरंदर : http://www.misalpav.com/node/20592
अनामिक भटकंती ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323

राजगड च्या वारीlला जाणे हे खुप वर्षांपासुन असलेले स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा योग जवळ आला होता.
राजांचा गड आणि गडांचा राजा.. राजगड.
शिवरायांच्या वास्तव्याने पवित्र झालेला राजगड.
राजारामा महराजांच्या जन्माचा साक्षिदार आणि
सईबाईंच्या मृत्यत कासाविस झालेला राजगड.
तानाजी मालुसरेंची अंतयात्रा अनुभवलेला राजगड..
आणि आज , शिवछत्रपती जयंतीदिनी १९ फेब्रुवारी ला राजगडावर जात आहोत, ह्या कल्पणेनेच मनात उत्तुंग आनंदाची लहर पसरली होती... सकाळी लवकर आवरुन ही मात्र मित्र हृषिकेश मुळे पुण्यातच १० वाजले. आणि बाईकने नसरापुरमार्गे गुंजवणे गावात पोहचण्यास १२ वाजुन गेले होते.
जिप्सींच्या शिवसंवर्धन गृपमध्ये जाण्यासाठी फोन हातात घेतला आणि गडावर रेंज नसल्याने आम्ही चालु लागलो.

सूर्य बरोबर शिरावरती घेवुन राजगड तळपत होता.. आणी या उन्हात ही सोनेरी वाटा शिवछत्रपतींच्या जन्मदिनी जनु सोनेरी क्षणांची आठवण सांगत होत्या..
जिकडे बघावे तिकडे सोनेरी पिवळे धमक वातावरण ..

अलिंगन देण्यास सदैव तत्पर : राजगड

रस्ता:

सोनेरी वाट

पालखी खाली न्हेताना :

चोरदरवाजा

तोरणा किल्ल्याचे दर्शन

पद्मावती तळे

पदमावती माची.

चोरदरवाजातुन वरती आल्यावर पद्मवाती माचीवर पद्मवती तलावाचे दर्शन झाले.. पद्मावती मंदिरामध्ये जिप्सींची गाठ घेतली.. त्यांच्या या अमुल्य कार्यात यावेळेस खुप कमी हातभार लागल्याची खंत आहेच. पण पहिल्यांदाच राजगडाचे स्वप्न पुर्ण होत असताना, कसलेच भान राहिले नाही. पद्मावती देवीच्या मंदिरात बॅग टाकुन आम्ही लागलीच सुवेळा ( पुर्वेकडील राजगडाची माची) कडे वळालो..

सदर आणि राजेंचा पुतळा

सुवेळा माची

सुवेळा माची :

बालेकिल्ला :

नगारखाना

थोडे पुढे गेल्यास, एक तटबंदी दिसते, थोडे आत चालत गेल्यावर, तेथे खाली एक दरवाजा आहे असे बाटते.. खाली उतरताना तिव्र उतार आहे.. आणि मग तसेच खाली गेल्यावर कळते तेथे तिन दरवाजे आहेत एकामागुन एक.
तोच गुंजवणे दरवाजा (दर्वाजातुन बाहेर गेल्यावर डायरेक्ट दरी आहे.)

मी ( मागे सुवेळा माची):

बालेकिल्ला:

माची

सुवेळा माचीचा आतील पहिला टप्पा:

चिलखती बुरुज

नेढः

हस्तीप्रस्तरः

शेवटचे टोक

सूर्यास्त

परत येण्यास रात्र झाली होती, सदरेवर निवांत बसलो, अमावसेमुळे चंद्र आकाशात नव्हता.. मिट काळोखात आणि चांदण्याच्या कल्लोळात राजगडाचा इतिहास आठवत होता...
राजांच्या अविस्मरणिय क्षणांचा इतिहास प्रत्येक्ष पाहिलेल्या या जागेवरती आज आपण आहोत, याने मन भरुन आले होते.. हिंदवी स्वराज्याचे तोरण १६४६ ला तोरणा जिंकून महाराजांनी त्यावर उभारले. आणि अर्धवट बांधलेल्या मुरमदेवाचा डोंगर (राजगड) १६४७ ला स्वराज्यात आला. स्वराज्याच्या तोरणाला साजेशे स्वराज्याचे द्वार मिळाले होते.

बाजुला चाललेले चांदण्यांसंबंधीचे बोलणे मनावर आदळत नव्हतेच.. कारण मनात तरंग उमटत होते, राजगडाचे ..स्वराच्याच्या सुर्योदयाच्या चित्राचे.
असंख्य मावळ्यांना शिवरायांनी याच गडावर घडविले.
सेनापती वीर बाजी पासलकर, सुभेदार तानाजी मालुसुरे ( वाडा : सुवेळा माची) , सूर्याजी मालुसुरे, हैबतराव शिळीमकर, येसाजी कंक ( ज्यांनी हत्तीशी झुंज देताना, तलवारीच्या एका वारामध्ये हत्तीची सोंड धडावेगळी केली ते. वाडा: संजीवनी माची), गोदाजी जगताप, बाबाजी पायगुडे, बाबाजी धुमाळ, सरदार झुंझारराव मरळ, मोराजी घुले, हिरोजी फर्जेद, सरपाले, खोपडे, निगडे, भरम, दिघे, तानाजी पोकळे, हिरोजी तनपुरे , रामजी दगडे, भिकाजी दांगट, रामजी करंजावणे, मल्हारी खिरीड, शेडगे, चोरघे, मुजूंबले, बाबाजी कोंडे, शेंडकर, नाग नायक गायकवाड, भोसले, पवार, दसवडकर, दामगुडे, शेडगे, दरडीके, कदम, ढमढेरे, भुरुक, वेगरे, कोकाटे, पवार, डोंबे, शिंदे आदी मावळ्यांचा महामेळा या गडांच्या अंगाखांद्यावर राबत होता. ( नोट : मावळ्यांची लिस्ट राट्रभक्तीचे शौर्यपिठ या पुस्तकातुन साभार)

बहामनी राज्याची पाच शकले होऊन निर्माण झालेल्या अहमदनगरच्या निजामशाहीने :अहमद बहिरीने , १४९० मध्ये हा डोंगर ताब्यात घेवून मंदिराचा व मुर्तीचा विध्वंस करुन आपला अधिकारी नेमला.
१६४८ साली, शिवरायांनी डोंगराच्या माच्या बांधुन, बुरुज उभारुन, कडे तासुन आणि तटबंदी ने नटवुन राजबिंडा ' राजगड' उभा केला.

सकाळी ५ लाच उठुन आवरुन बसलो..

सर्योदयाचे खुप सारे फोटो घेण्याचा मानस होता, पण मित्रांमुळे उशीर झाला.
आज माझ्या आणि ह्रषिकेश बरोबर, आमच्या बारामतीचे २ मित्र अ‍ॅड झाले होते.

सुर्योदयः

महाराणी सईबाईंची समाधी

बालेकिल्ला

महादरवाजा :

आज महाशिवरात्री होती : शंकराचे पहिले दर्शनः

चंद्रतळे ( खुप गोड पाणी आहे येथील)

राजवाड्याचे अवशेष

सदर

दिसणारी संजीवनी माची

संजीवनी माची

बालेकिल्ल्याचे एक कडा:

राजमार्ग असलेला, पाल दरवाजा :

संजीवनी च्या वाटेवरुन :

माचीच्या पायथ्यापासुन येणारी वाट या दरवाजापाशी येते:

चिलखती बुरुज आणि दिसणारा बालेकिल्ला

संजीवनी माची:

दोन तटबंदी मध्ये असलेला खंदक

अळू दरवाजा .. येथुनच तोरणाकडे जाता येते.

गुंजवणे गावातील शंकराचे मंदिर

- शब्दमेघ... एक मुक्त..स्वैर..स्वच्छंदी जीवन.