मिपावर आत्तापर्यंत अतिशय उत्तम दर्जाचे आणि लिजंड बनले आहे असे खूप लेखन आले आहे. आत्ताच वर आलेला 'काटेकोरांटीची फुले' हा धागा बघा. वन ऑफ द लिजंड्स ऑफ मिपा! कोणीतरी वर काढला. नविन सदस्यांनी आत्ताच वाचला. तसंच बघितलं तर धनंजयचा 'कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे' हा लेख.
तर, असे काही धागे... कथा, कविता, चर्चा इत्यादी... एक वेगळी लिस्ट बनवून तिथे हायलाइट करता येतील का? या विभागाला आपण 'हॉल ऑफ फेम' असं काहीसं शीर्षक देऊ. आणि तिथले धागे निवडण्यासाठी काही नामवंत सदस्यांना नियुक्त करू.
साधारण, ४० / ५० धागे यात येतील. आणि नवीन सदस्यांना अतिशय दर्जेदार लेखन आल्या आल्या बघायला मिळेल. आणि त्यांनी प्रतिसाद दिले तर असे धागे वर राहतील. कचरा आपोआप मागे पडेल.
काय म्हणताय, मंडळी?