खरडवह्यांसाठीची आचार संहिता

नयनी अदिती प्रियाली वाद काही महिन्यांपूर्वी झाला तेव्हा या मुद्द्यापाशी आपण येऊन थांबलो होतो असे आठवते. बहुतेक तेव्हा, खरडवह्यांसाठीही असे काही धोरण तयार करू असे नीलकांत म्हणल्याचे आठवते आहे.

खरडवह्या हे मिपाच्या युएसपी मधले एक महत्वाचे कलम आहे. एकेकाळी मुख्य धाग्यांपेक्षा खरडवह्याच जास्त वाचल्या जायच्या. तिथले वादही रंगले आहेत. यशोधरा, नीरजा, विप्र यांच्यातल्या वादात खरडवह्या सार्वजनिक की व्यक्तिगत हा मुद्दा पहिल्यांदा चर्चिला गेला होता असे आठवते. अशी अजूनही बरीच उदाहरणे आहेत.

मला वाटतं की खरडवह्यांबद्दल एक निश्चित अशी स्पष्ट भूमिका मिपाने घ्यावी आणि तिचा समावेश अधिकृत धोरणात व्हावा. ती भुमिका काय असावी याचा निर्णय आपण सर्वांनी चर्चा करून घ्यावा.

या बाबतीत माझी भूमिका :

खरडवह्या या स्ट्रिक्टली दोन सदस्यातील व्यक्तिगत संवादाकरिता आहेत. त्यामुळे तिथे अ ने ब शी क बद्दल बोलले किंवा अजून काही बोलले किंवा काय बोलले याबद्दल मिपाव्यवस्थापन उत्तरदायित्व घेऊ शकत नाही. तसेच, मिपाचे संपादक किंवा सल्लागार किंवा सरपंच किंवा तंत्रज्ञ, सतत खरडवह्यांवर नजर ठेवू शकत नाहीत.

मात्र, खरडवह्यातील मजकूर हा एका अर्थाने जाहिर असल्यामुळे तिथे सभ्यतेच्या ज्या सर्वसाधारण चौकटी आहेत त्या पाळल्या जाव्यात. अश्लील, जातीवाचक, धार्मिक तेढ वाढवणारे असे लेखन निदर्शनास आणून दिले असते अथवा निदर्शनास आले तर मात्र आपण त्यावर कारवाई करावी. मात्र इथे अश्या लेखनाकडे बघण्याची आपलीही चौकट तशी लिबरलच असावी. दिसला मजकूर की उडव अशा प्रकारचे इम्प्रेशन सदस्यांमधे होणार नाही याची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे.

सायबर लॉ प्रमाणे खरडवह्याही बहुतेक जाहिर मजकूरात येत असाव्यात. याबद्दल तपास व्हावा.

मुख्य म्हणजे, जे काही ठरेल ते ठळकपणे अधिकृत धोरणात मांडले जावे.