समुद्र किनार्याचे आकर्षण काही वेगळेच असते. :) त्यातही ते कोकणातले असतील तर मग पहायलाच नको !
अश्याच गुहागरच्या समुद्र किनार्यावर केलेल्या भटकंतीचे हे काही क्षण आहेत.
समुद्रकिनार्यावर पोहचण्याच्या जरासे आधी काही दुकाने होती,त्यावर आकाशकंदील लावलेला माझ्या नजरेस पडला... फार आवडला,त्याला पाहुन हा विचार देखील केला की सुर्यास्त झाल्यावर हाच कंदील कसा दिसत असेल ? मग याला पहिला टिपला.

समुद्र किनार्यालगत घोडागाडीत फिरण्याची मजा अनुभवणारी ही मंडळी.

समुद्राच्या पाण्यावर चालणारा प्रकाशाचा खेळ फार मोहक असतो...

असेच अजुन दोन क्षण !
क्षण १

क्षण २

मग एक नजर सुर्याकडे टाकली... सुर्यास्तास अजुन बराच वेळ होता.

परत एकदा घोडागाडी धावताना दिसली...

सुर्य जरासा खाली झाला...

घराकडे परतणारे पक्षी...आकारात आणि लयीत उडण्याची कला यांनी कुठुन शिकली ? :)

मला आवडणारा रंगाचा खेळ...

लाल लाल गोळा...

माझ्या सौभाग्यवतीने वाळवंटातल्या जहाजावर बसुन एक चक्कर टाकुया अशी इच्छा प्रकट केली. आणि तात्काल मी त्याची पुर्तता केली. ;)

वरच्या फोटतले बादल आणि बादलचे मालक. हो बादल त्या उंटाचे नाव. :)
उंटाची बसण्याची एक वेगळीच बैठक असते,तो जेव्हा खाली बसतोआणि जेव्ह्या उठुन उभा राहतो तेव्हा,त्याचे अंग अत्यंत विचित्र पद्धतीने खालीवर करतो ! ;) त्यामुळे ही उठक बैठक सोप्पी नसते. ;)
आमची सवारी निघाली !

कसा बसा कॅमेरा सांभाळला ! आणि समुद्र किनार्यावर नजर टाकली.कॅमेरा बंद करुन टाकला ! ;)
फेरी संपल्यावर मालकासह बादल त्याच्या बैठकीत आरामात बसला.

हल्ली कोणताही प्राणी कितीही क्युट वाटु शकतो,त्यामुळे बादलचा एक सोलो फोटो काढुन ठेवला ! ;)

आता सुर्यास्त जवळ आला होता,त्यातले दोन क्षण मला टिपता आले.
सुर्यास्त क्षण १

सुर्यास्त क्षण २

आता नजर लाटांकडे वळली...

क्षितीजाकडे पाहतच रहावे वाटते... :)

निघायच्या आधी त्या अथांग सागराला शेवटचे पाहिले...

हो,हा तोच पहिल्या फोटोतला कंदील...

पुढच्या भागात...
श्री वॅळणेश्वर दर्शन.
चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी
कॅमेरा निकॉन पी-१००
मोड:- अॅप्रेचर प्रायोरिटी
मिटरींग-स्पॉट.
*फोटो फक्त कंप्रेस केले आहेत.सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....