अनामिक भटकंती ४: केरळ - B. अॅलेप्पी: http://www.misalpav.com/node/20253
अनामिक भटकंती ४: केरळ - A.मुन्नार: http://www.misalpav.com/node/20240
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
त्रिवेंद्रम - कोवलम मध्ये दुपारी आल्यावर, संध्याकाळ मस्त लाईट हाउस( हवा) बीच वर घालवायची असा इरादा होता, पण अचानक जवळ असलेले पूवार आठवले, पूवार तसे पर्यटनापासुन अजुन तरी दूर होते., नजिकच्या काळात तो एक हॉट स्पॉट होउ पहात आहे.
ड्रायवर ला निटसे विचारुन घेतले, आनि समुद्रावर मस्त हुंदाडायला घातलेल्या साध्या कपड्यावरच पूवारला जाणे फायनल झाले..
कोवलम पासुन १७ किमि दूर, आणि कन्याकुमारी ला जोडुन केरळचे सर्वात शेवटचे टोक म्हणजे पूवार. नेय्यार नदि येथे समुद्राला मिळते, जेथे समुद्राला मिळते तेथे बॅक वॉटर मध्ये तीन आयलंडस तयार झालेत, गर्द झाडी.. निळेशार नदिचे स्वच्छ पाणी, आणि नदी आणि समुद्राच्या मध्ये असलेला सोनेरी बीच, (Golden beach म्हणजे येथे संध्याकाळी सर्व किनारा सोनेरी होतो)
आता आमची पाण्यातील प्रवासाला ( जे मला खुप आवडते) सुरवात झाली...
पलिकडे दिसत आहे तो बीच, आता आम्ही नदिच्या पाण्यात आहोत, त्या बिच च्या पलिकडे समुद्र आहे, उजव्या कोपर्याला नदि समुद्राला मिळते, पण सध्या पाणी कमी झाल्याने, आणि वाळु जास्त वाहत आल्याने प्रत्यक्ष तो क्षण टिपता आला नाही, उगाच तेथे उड्या मारल्या...
समुद्रः
एका बाजुला समुद्र, दुसर्या बाजुला नदि
D. कोवलम :
सकाळी त्रिवेंद्रम ला पद्मनाभ टेंपलला भेट देवुन , आरतीच्या टाईमला बरोबर दर्शन घेवून पुन्हा जेवुन कोवलम ला आलो,
केरळा राईस प्लेट, नंतर घम्याले (भाताचे) घेवुन अनलिमेटेड वाडले जाई,
लाईट हाऊस बीच :
आमच्या हॉटेल मागील बीच :